साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
ग्रेझिया डेलेडा
Grazia Deledda
जन्म : 27 सप्टेंबर 1871
मृत्यू : 15 ऑगस्ट 1936
राष्ट्रीयत्व : इटालियन
पुरस्कार वर्ष: 1926
ग्रेझिया डेलेडा या इटलीच्या सुप्रसिद्ध कादंबरी लेखिका होत्या. मुसोलिनी यांच्या काळातील त्या लेखिका होत्या. मुसोलिनींना त्यांचे लेखन आवडायचे. त्यांचे लेखन मानवी समस्यांवर प्रकाश टाकणारे होते. त्याचबरोबर इटलीच्या प्राचीन परंपरा, रीतिरिवाज, इतिहास यावर आधारित त्यांनी लेखन केले. ‘ऐशिज’, ‘द आयव्ही’, ‘दि वुमेन अँड द प्रीस्ट’, ‘द मदर’ इत्यादी कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत.