Amazon Rainforest: Amazon weasel- ॲमेझॉन मुंगूस

जगात सर्वत्र मुंगूस हा प्राणी आढळतो.प्रत्येक देशातील भौगोलिक आणि हवामान विषयक परिस्थितीनुसार प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या आहेत. मुंगसाच्याही जगात वेगवेगळ्या प्रजाती आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मुंगसे आहेत. या मुंगसांना Amazon weasel असे म्हणतात. भारतीय मुंगूस आणि ॲमेझॉन मुंगूस यांच्या आकारात फारसा बदल नसला तरी रंगात बदल आहे. या ॲमेझॉन मुंगसाला उष्णकटिबंधीय मुंगूस असे म्हणतात. या मुंगसांचे पोट पांढरे असते. पाठीवरचे केस फिकट तपकिरी असतात. हे मुंगूस लांबीला (शेपटासह) 45 ते 55 सेमी पर्यंत असते. सडपातळ बांधा आणि अंगावर मुबलक केस, लहान पाय हे या मुंगसांचे वैशिष्ट्य आहे. सापाने हल्ला केला तरी त्यांचे दात केसांमुळे मुंगसाच्या शरीरापर्यंत जात नाहीत. केसांमुळे त्यांचा बचाव होतो. मुंगूस हा प्राणी मिश्राहारी आहे. तो फळे खातो. सापासारखे प्राणी मारुन त्याचे रक्त पितो. मुंगूस हा एक सस्तन प्राणी आहे. तो अंडी घालत नाही. पिलांना जन्म देतो. त्यांचे कुटुंब छोटे असते.

  1. Amazon rainforest :Howler Monkey
  2. Amazon rainforest : Spider Monkey
  3. Amazon rainforest :Blue morpho butterfly-निळे फुलपाखरु

Leave a comment