Golden headed Manakin दक्षिण अमेरिकेतील पक्ष्यांच्या विविध प्रकारांपैकी एक आहे. अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशात हा पक्षी आढळतो. Amazon rainforest च्या महाकाय प्रदेशातील हा एक छोटासा पक्षी आपले अस्तित्व टिकवून आहे. कोरड्या आपण ओलसर ठिकाणीही हा पक्षी आपले वास्तव्य करण्यास यशस्वी झाला आहे. या पक्ष्याची एकूण लांबी 9 सेमी च्या आसपास आहे. यावरून हा पक्षी किती लहान आहे, हे स्पष्ट होते. सोनेरी डोके, पिवळी चोच, पूर्ण शरीरावरील पिसे काळसर, गुलाबी रंगाचे पाय असे या पक्ष्याचे रंगीय स्वरुप आहे. मादीचा रंग किंचित ऑलिव्ह-हिरव्या रंगाचा आहे. शेपटी साधारण गुलाबी असते. पनामा, कोलंबिया, ब्राझील, पेरु इत्यादी देशांत हे लहान पक्षी आढळतात. फळे, कीटक, लहान बिया खाऊन हे पक्षी आपला उदरनिर्वाह करतात. हे सोनेरी डोक्याचे मानकीन 10 ते 15 पक्ष्यांच्या गटाने आपले वास्तव्य करतात.
हे सुद्धा आवर्जून वाचा