दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest आढळणाऱ्या विविध पक्षांपैकी spix’s guan हा एक वैशिष्ट्यपूर्ण पक्षी आहे. दक्षिण अमेरिकेतील गर्द वृक्षाच्छादित प्रदेशात हमखास आढळणारा पक्षी म्हणजे spix’s guan होय. साधारणपणे तपकिरी रंगाचा हा पक्षी झाडांमध्ये आश्रयासाठी बसला तर तो सहसा दृष्टीस पडत नाही. हा पक्षी झाडावर बसताना वेगळा आवाज काढतो आणि आकाशात झेप घेताना वेगळा आवाज काढतो.या पक्ष्याला दाट झाडीत राहायला आवडते. बऱ्याच वेळा हे पक्षी एकटेच आढळतात.तर काही वेळा जोडीने आढळतात प्रजनन काळात नर-मादी एकमेकांच्या सहवासात राहतात. हा पक्षी cracidae family तील आहे. या पक्ष्यांची लांबी सरासरी 70 सेमी असते. नर पक्ष्याचे वजन सरासरी 1.5 किलोग्रॅम असते. मादी पक्षाचे वजन नराच्या तुलनेत अधिक असते. ब्राझील, इक्वेडोर बोलिव्हिया, पेरु गयाना, सुरीनाम, व्हेनेझुएला, कोलंबिया या देशांमध्ये स्पिक्स ग्वान आढळतात. या पक्ष्यांचा प्रजननाचा कालावधी प्रत्येक देशातील हवामानातील बदलांनुसार वेगवेगळा असत., पेरु देशात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात हे पक्षी अंडी घालतात, तर अन्य देशात वेगळा कालावधी असतो. हे पक्षी झाडांच्या पानांपासून आपले घरटे बांधतात. त्यांचे घरटे सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांसारखे आकर्षक नसते. या पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.