दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये असलेला एक जलचर प्राणी म्हणजे Amazonian manatee. होय. सुमारे 300 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा हा प्राणी जलचर प्राणी असून ॲमेझॉनच्या भव्य नदीत याचा वावर असतो.पाणघोड्यासारखा दिसणारा हा मानाटी जलचर प्राणी पाण्यातील गवत आणि वनस्पती खाऊन गुजराण करतो. यांच्या पिलांना काळ्या मगरींपासून धोका संभवतो. या मानाटीचा अधिवास गोड्या पाण्यात असून हा वैशिष्ट्यपूर्ण manatee फक्त अमेझॉनच्या जंगलातच आढळतो. या मानाटीची त्वचा करडी, तपकिरी अशा रंगांची असून तो कोलंबिया, पेरु, बाझील, इक्वेडोर इत्यादी देशांतून वाहत जाणाऱ्या ॲमेझॉन नदीत आढळतो. इतर ठिकाणी आढळणाऱ्या मानाटीपेक्षा Amazonian manatee’ पूर्णत: वेगळा आहे.