Amazon rainforest : Black Caiman

दक्षिण अमेरिकेतील सर्वांत खतरनाक आणि आकाराने मोठा असणारा मगर कुळातील प्राणी म्हणजे Black caiman होय. Amazon Rainforest मध्ये आढळणारी ही काळी मगर ॲमेझॉन नदीत आढळते. सुमारे 1300 हून अधिक प्रकारचे जलचर असणारी ॲमेझॉन नदी जितकी सुंदर दिसते, तितकीच ती धोकादायक आहे. या नदीत पोहणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय.प्रचंड ताकद‌वान आणि सुमारे 450 किलोग्रॅम पेक्षा जास्त वजन असणाऱ्या या काळ्या मगरीची लांबी 5.5 ते 6.5 मीटर असते, ॲमेझॉन नदीतीलच जलचर प्राणी खाऊन ही Black caiman आपले गुजराण करते. ही काळी मगर नदीचे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची दबा धरून शिकार करते. आणि क्षणार्धात भक्ष्याचे तुकडे तुकडे करून गिळून टाकते.

Amazon Rainforest : Anaconda.

Leave a comment