दक्षिण आफ्रिका, भारत ,आशिया आणि दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणात माकडे आहेत. प्रत्येक देशातील माकडाच्या प्रजाती भिन्न-भिन्न आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या माकडांमध्ये Dusky titi monkey हे एक वैशिष्ट्यपूर्ण माकड आहे. लाल रंगाचे पोट असलेले हे टीटी माकड़ ब्राझील देशात मोठ्या प्रमाणात आढळते. ॲमेझॉनच्या जंगलात, झुडपांमध्ये आश्रयासाठी हे माकड राहते. गोलाकार डोके आणि कुबड काढलेल्या अवस्थेत बसण्याची सवय हे या टीटी माकडाचे खास वैशिष्ट्य आहे. या टीटी माकडाचे शरीर एक ते दीड फूट लांबीचे असते. फळे, कीटक, पक्षांची अंडी, लहान पक्षी, इत्यादी त्याचे स्वाद्य आहे. या माकडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे टीटी माकड एका वेळी एकाच पिलाला जन्म देते. पुरुष माकडांच्या पाठीवरील केस राखाडी, लालसर रंगाचे असतात. उष्णकटिबंधीय प्रदेशात नदीकाठच्या ठिकाणी वास्तव्य करायला या टीटी माकडांना आवडते.