Amazon rainforest: Squirrel Monkey – खार माकड

दक्षिण आणि मध्यवर्ती अमेरिकेत आढळणारी माकडाची एक जात म्हणजे Squirrel Monkey होय. हे माकड आकाराने खूप लहान असते. त्याची हालचाल, फळे खाण्याची पद्धत आणि झाडावर सरसर चढण्याची कला पाहिली तर या सर्व बाबी खार या प्राण्याशी (Squirrel) मिळत्या-जुळत्या आहेत. म्हणूनच Amazon Rainforest मध्ये आढळणाऱ्या, खारीसारखी हालचाल असणाऱ्या या माकडाला Squirrel monkey असे म्हणतात. Saimiri वंशातील ही खार माकडे लहान आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. साई- मिरी म्हणजे लहान माकड, असेही या खार माकडाला नाव आहे. ही माकडे कोस्टारिका, पनामामध्ये सुद्धा काही प्रमाणात आढळतात. या गिलहरी माकडांचे वैशिष्ट्य म्हणजे हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना खूप घाम येतो. त्यामुळे त्यांचे हाताचे आणि पायाचे तळवे नेहमी ओलसर जाणवतात. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील ही गिलहरी माकडे संशोधनासाठी आणि प्राणिसंग्रहालयात ठेवण्यासाठी पकडली जातात. फळे हे या खार माकडांचे मुख्य अन्न आहे.

हे सुद्धा आवर्जून वाचा

  1. Amazon rainforest : Spider Monkey
  2. Amazon rainforest :Howler Monkey

Leave a comment