Amazon rainforest : Tucuxi river dolphin: टुकुक्षी डॉल्फिन

डॉल्फिनचे सामान्यतः दोन प्रकार पडतात .ते म्हणजे गोड्या पाण्यातील डॉल्फिन आणि खाऱ्या पाण्यातील डॉल्फिन होय. दक्षिण अमेरिकीतील Amazon rainforest मध्ये पेरु, ब्राझील, कोलंबिया आणि इक्वेडोर देशांतून वाहणाऱ्या नदीत Tucuxi dolphin मोठ्या प्रमाणात आढळतात. या प्रदेशांव्यतिरिक्त पृथ्वीतलावर हे टुकुक्षी डॉल्फिन कोठेही आढळत नाहीत. या डॉल्फिनचे वैशिष्ट्य म्हणजे हे मासे कळपाने राहत असले तरी हा कळप खूप मोठा नसतो. एका कळपात 8 ते 13 डॉल्फिन असतात आणि ते सर्व family members असतात. इतर डॉल्फिन प्रमाणे हे डॉल्फिन सु‌द्धा बु‌द्धिमान असतात. माणसाशी चटकन मैत्री करतात. त्यांच्या या स्वभावामुळे अनेक dolphin show मध्ये त्यांचा वापर केला जातो. ॲमेझॉन नदीतील लहान मासे, ऑक्टोपस आणि इतर लहान लहान जलचर प्राण्यांना डॉल्फिन आपले खाद्य म्हणून वापरतात. बॉटलनोझ डॉल्फिन आणि टुकुक्षी डॉल्फिन यांच्यात थोडे साम्य आहे. टुकुक्षी डॉल्फिन जास्तीत जास्त 35 वर्षे जगू शकतो. टुकुक्षी डॉल्फीन च्या चरबीपासून आणि त्वचेतून जे तेल काढले जाते, त्या तेलाचा उपयोग मूळव्याध, संधिवात, जखमांवर उपचार म्हणून केला जातो.

Amazon rainforest animals: (Amazon river dolphin)

Leave a comment