Amazon Rainforest : Green Iguana- हिरवा इग्वाना

सरडा हा बहुतेक देशात आढळणारा सरपटणारा प्राणी आहे. दक्षिण अमेरिकेच्या विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये अनेक सरपटणारे प्राणी आहेत. त्यांपैकी Green Iguana हा एक वैशिष्ट्यपूर्ण सरडा आहे. या सरड्याला अमेरिकन ग्रीन इ‌स्वाना असेही म्हणतात. हा एक शाकाहारी सरडा आहे. मेक्सिको, ब्राझील, कॅरेबियन आयर्लंड प्रदेशात हा हिरवा इग्वाना सरडा आढळतो. हा सरडा अंडज वर्गातील सरपटणारा प्राणी आहे.हे सरडे ठराविक काळात काही प्रमाणात आक्रमक बनतात. हा सरडा डोक्यापासून शेपटीच्या टोकापर्यंत 5 ते 6 फूट लांबीचा असतो. त्यांचे वजन 8 ते 10 किलोग्रॅम असू शकते. हा एक पृष्ठवंशीय अंडज गटातील प्राणी असून या सरड्याच्या शरीरावर हिरव्या रंगाचे खवले असतात. म्हणूनच या सरडयाला ग्रीन इग्वाना म्हणतात. या सरडयाच्या माद्या वर्षातून एकदाच अंडी घालतात.अंड्यांची संख्या 20 ते 70 पर्यंत असू शकते. अंड्यातून पिल्ली बाहेर यायला 10 ते 15 आठवडे लागतात. जमिनीत खोल बिळे पाडून त्या बिळांत हे सरडे अंडी घालतात व सुरक्षा म्हणून बिळाचे तोंड बुजवुन घेतात. अंड्यातून बाहेर येताच ही पिल्ले लगेच मोठी होतात. स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकतात.

Amazon Rainforest: Amazon weasel- ॲमेझॉन मुंगूस

Leave a comment