दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यांतील Giant waterlily ही वनस्पती एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वर्तुळाकार भव्य पानांमुळे ही वनस्पती विशेष प्रसिद्ध आहे.या वनस्पतीला व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका असेही म्हणतात.या वनस्पतींच्या पानांना लीली पॅड असेही म्हणतात. या पानांचा व्यास 3 मीटर पर्यंत असतो. म्हणजे या वॉटर लीलीचा परीघ जवळजवळ 7 मीटरपर्यंत असतो. यावरून या पानांच्या आकाराची आपल्याला कल्पना येते. व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका ही या वॉटर लीलीची सर्वांत मोठी प्रजाती आहे. अर्थात ही वनस्पती पाण्यातच वाढते. आणि या वनस्पतींची पाने पायावर तरंगत राहतात. ॲमेझॉन या भव्य नदीत ज्याठिकाणी उथळ पाणी आहे, अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. या वनस्पतीच्या सौंदर्यामुळे आणि वर्तुळाकार पानांमुळे अनेक देशांनी ही वनस्पती आपल्या देशात स्थलांतिरित केली आहे. सूर्य मावळतीला झुकला की ही पाने उघडायला लागतात. संपूर्ण पाने उलगडण्यासाठी दोन दिवस लागतात.ज्या ठिकाणी ही वॉटर लीली वाढते, त्या ठिकाणी सहसा इतर पाण वनस्पती वाढत नाहीत. जरी वाढल्या तरी या वनस्पती पाण्याच्या वर डोके काढत नाहीत.