सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी घेणारे 80% हून अधिक भारतीय लोक असतील. संपूर्ण जगाचा विचार करता हे प्रमाण असेच असेल. किंबहुना त्याहून जास्त असेल. याचाच अर्थ चहा-कॉफी ही एक आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनलेली आहे.पण ही कॉफी आली कुठून ? दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest हे कॉफीचे मूळ वसतिस्थान आहे. सकाळची सुरुवात आपली चहा किंवा कॉफीपासून करणारे हेच ते Coffee Plant होय. या कॉफीच्या वनस्पतीची उंची 10 फुटांपर्यंत असते. आपण कॉफीच्या झाडाचे निरीक्षण केल्यास या झाडाला फळे लागतात. ही फळे लहान असतात. हिरड्याच्या फळाएवढी लहान फळे असतात .त्यांचा रंग लालसर असतो. काही ठिकाणी जांभळ्या रंगाची सुद्धा फळे पाहायला मिळतात. उष्णकटिबंधीय अनेक देशात कॉफीची लागवड केली जाते. दक्षिण भारतात कॉफी हे मुख्य पेय आहे. उत्तर भारतात चहा हे मुख्य पेय आहे. महाराष्ट्र चहा-कॉफी घेणारे राज्य आहे. भारतात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे पाहायला मिळतात.या झाडाला प्रथम पांढरी आणि सुगंधित फुले येतात. फळे लागतात. याच फळांपासून कॉफी बनवली जाते.