प्राणी आणि पक्षी यांचे माहेरघर म्हणजे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मधील घनदाट जंगल होय. या जंगलात हजारो प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात.या प्राण्यांमध्ये शाकाहारी, मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे प्राणी आढळतात. तर काही प्राणी मिश्राहारी आढळतात. या ॲमेझॉनच्या जंगलातील Tayras हा एक इरा वंशातील वैशिष्ट्यपूर्ण असा प्राणी आहे. ब्राझील, पेरु, बोलिव्हिया, या देशातील ॲमेझीनच्या जंगलात मोठ्या प्रमाणात हे टायरस आढळतात. टायरस किंवा टायरा हा लांबलचक आणि चपळ प्राणी आहे. त्याची लांबी सर्वसाधारणपणे 70 सेमीपर्यंत असते. तर वजन 8 किलोग्रॅमपर्यंत असते. त्याच्या छातीवर पिवळसर- नारिंगी हृदयाच्या आकाराचा पांढरा स्पॉट असतो. त्याचे संपूर्ण शरीर गडद तपिकिरी काळ्या रंगाचे असते. उंदरासारख्या लहान प्राणी शिकार करून खातो. इतर पक्षी, सरडे, सरपटणारे प्राणी यांची पण शिकार करून खातो. टायरस हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. या टायराला लांब आणि झुपकेदार शेपट्या आहेत.