Euphorbiaceae : युफोर्बियास

दक्षिण अमेरिकेतील फुलांच्या अनेक वनस्पती आहेत. त्यांची संख्या अगणित आहे. Amazon rainforest मधील अनेक फुलांच्या वनस्पतीमधील एक म्हणजे Euphorbiaceae होय. ही वनस्पती उष्ण कटिबंधातील देशांत सापडते. या शिवाय बर्फाळ प्रदेश वगळता अन्य देशांतही हे फूलझाड आढळते. या वनस्पतीला लागणारी नर आणि मादी फुले एकाच झाडाला असतात. जगातील सर्वात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या या वनस्पतींमध्ये युफोर्बियास या वनस्पतीचा पाचवा क्रमांक लागतो. या वनस्पतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीच्या संपूर्ण पृथ्वीतलावर 7500 प्रजाती आहेत. यावरून युफोर्नियास या वनस्पतीचे जगातील स्थान किती अनन्यसाधारण आहे, हे लक्षात येईल. युफोर्बियास या वनस्पतीच्या अनेक प्रजातींमध्ये औषधी गुणधर्म आहेत. युफोर्बियास टिरुकल्ली ही वनस्पती कर्करोगावर गुणकारी मानली जाते. काही वनस्पतीमध्ये विषारी द्रव्य सुद्धा असते. या वनस्पतींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पती एक वार्षिक वनस्पतीपासून ते बहुवार्षिक वनस्पतीपर्यंत आढळतात. वाळवंटातही काही प्रमाणात या वनस्पती आढळतात. काही वनस्पतींची मुळे बारिक आहेत , तर काहींची मांसल, कंद‌युक्त आहेत.

Amazon Rainforest :Acai Palm: अकाई पाम

Leave a comment