एखाद्या जंगलातील मांसाहारी प्राण्यांचे अस्तित्व टिकण्यासाठी त्या जंगलात शाकाहारी प्राणी सुद्धा असावे लागतात. आणखी एक बाब म्हणजे एखाद्या जंगलात केवळ शाकाहारीच प्राणी असतील, तर त्यांची संख्या अमर्याद वाढत जाईल. पर्यावरणाचे संतुलन बिघडेल. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी आहेत. म्हणूनच तेथील जैवविविधता टिकून आहे. Paca हा एक उंदीरवर्गीय प्राणी असून mara सारखीच ही एक तृणभक्षक शाकाहारी प्रजाती आहे . त्यांच्या शरीरावर ठिपके ठिपके असतात. Paca चे मूळ वसतिस्थान ॲमेझॉनचे जंगल हेच आहे. सर्वसाधारणपणे या प्राण्याची लांबी 80 सेमी पर्यंत असते. यांचे वजन 15 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. जिनी डुकरांप्रमाणेच हे उंदीर दिसतात. यांचे पाठीमागचे पाय मोठे असतात. तर पुढील पाय लहान असतात. पकास लांबून पाहिले तर सांबर किंवा हरणासारखेच दिसतात. त्यांच्या पाठीवर चार-पाच पट्टे असतात. त्यांचे कान लहान असतात. यांच्या पुढच्या पायांना प्रत्येकी चार बोटे असतात. तर मागच्या पायांना प्रत्येकी 5 बोटे असतात. पकासचे आयुष्य सरासरी 15 वर्षे असते.