AI चा long form आहे Artificial Intelligence. आणि Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. AI हे जगभर प्रसिद्ध असलेले तंत्रज्ञान आहे. नवीन विकसित झालेले हे तंत्रज्ञान असून या तंत्रज्ञानाच्या उदयामुळे मानवी जीवनात क्रांतिकारी बदल होत आहेत. या नवीनच उदयास आलेल्या तंत्रज्ञानाकडे अनेक युवक आकर्षित होत असून हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी अनेक विद्यापीठात कोर्सेसही सुरु केलेले आहेत. त्याचा फायदा नवीन शिकावू विद्यार्थ्यांना निश्चितच होत आहे.
ए-आय. म्हणजे काय? What is meaning of AI?
ए. आय. म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेप्रमाणे शिकण्याची क्षमता मशिन्समध्ये आणि मशिन्समध्ये असलेल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये [software programme] तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते, त्या तंत्रज्ञानला ए. आय तंत्रज्ञान असे म्हणतात. Artificial Intelligence लाच आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो.
पहिला संशोधक-The first researcher
Artificial Intelligence या तंत्रज्ञानाचे जनक आहेत जॉन मॅक्कार्थी (John Mccarthy ] . जॉन मॅक्कार्थी यांनी 1956 साजी ए. आय तंत्रज्ञानाचा शोध लावला, भविष्यात छोट्या छोट्या कामातही ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. माहिती तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. त्याच प्रमाणे ए. आय. तंत्रज्ञान ही काळाची गरज होणार आहे. ए. आय. तंत्रज्ञान सध्या बाल्यावस्थेत असले तरी भविष्यात हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा भाग होणार आहे.
नोकरीसाठी संधी – AI Technology.
जगातील विविध कंपन्या, सहकारी संस्था, बँका, उत्पादित कारखाने, माहितंत्रज्ञान कार्यालये, संरक्षण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, आरोग्य शास्त्र, वाहतूक विभाग, सायबर क्षेत्र अशा विविध क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणात ए. आय. तंत्रज्ञांची गरज भासणार आहे. त्यामुळे अनेक विद्यापीठांनी ए. आय. तंत्रज्ञानाचे विविध कोर्सेसही सुरु केले आहेत . भारतात मोठ्या प्रमाणात ए. आय तंत्रज्ञ निर्माण झालेत, तर त्यांना म्हणजे भारतीय युवकांना ज्यांनी ए. आय. चे कोर्सेस पूर्ण केले आहेत, अशा तरुणांना निश्चितच जगभरातून मागणी वाढत आहे.त्याचा लाभ होईल. आय. टी क्षेत्रात किंवा संगणक [Computer] क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुकांनी निश्वितच ए. आय.तंत्रज्ञानाचा कोर्स करावा. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे.
मनोरंजन क्षेत्रः Recreation Area
जगातील बहुतांश देशात करमणुकीची साधने उपलब्ध आहेत. ही मनोरंजक साधने इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी निगडित आहेत. विविध मालिका (सिरियल्स), सिनेमे, कार्टून फिल्म्स, विविश्व प्रकारचे बौद्धिक आणि शारीरिक व्यायामाचे खेळ इत्यादी विविध क्षेत्रात ए. आय. तंत्रज्ञानाचा दबदबा वाढणार आहे. संपूर्ण जगच ए. आय. तंत्रज्ञानाने व्यापून जाणार आहे. या सर्वच क्षेत्रात पूर्वीपेक्षा अधिक तंत्रशुद्धता, सफाईदारपणा आणि अचूकता येणार आहे. त्यामुळे ए. आय. तंत्रज्ञाना मनोरंजन क्षेत्रावर मोठा दबदबा निर्माण आहे.
गुगल, इन्स्टाग्राम, युट्युब, फेसबुक, एक्स मीडिया, ट्विटर इत्यादी क्षेत्रातही ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण जितका अधिक करू तितके आपले भविष्य अधिक उज्ज्वल आहे. तंत्रज्ञान आणि क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. सध्या जगातील 75% कंपन्या ए. आय. (AI) तंत्रज्ञानाचा वापर करतात . त्यामुळे आपल्यालाही स्पर्धात्मक क्षेत्रात टिकण्यासाठी AI तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे.
सध्या शेती आणि श्रमदानावर आधारित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारांची कमतरता वाढली आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आणि शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल करण्यासाठी AI तंत्रज्ञानाची गरज आहे.
तंत्रज्ञानाचे उज्ज्वल भविष्य: ए. आय. Future of AI
AI हे तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य आहे. AI अजून उर्जितावस्थेत आहे; तर त्याने गरुडझेप घेतली आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान अजून खूप पुढे जाणार आहे. AI मुळे न्यूरल नेटवर्क, रोबोटिक्स, ऑटोमेशन यांच्या वाढीस चालना मिळत आहे. प्रत्येक कंपनीला स्पर्धेत टिकण्यासाठी AI तंत्रज्ञानाची गरज आहे. आपला व्यवसाय भविष्यातही टिकून राहण्यासाठी प्रत्येक व्यावसायिकाला ए. आय चे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे AI चे तंत्र झपाट्याने वाढत असल्याने स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी प्रत्येक कंपनीला ए. आय. चा पुरस्कार केल्याशिवाय पर्याय नाही.
ए. आय फायदेशीर; तितकेच धोकादायक : AI is as profitable as it dangerous
AI तंत्रज्ञान निश्चितच फायदेशीर आहे, याच बरोबर या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला नाही किंवा हे तंत्रज्ञान चुकीच्या पद्धतीने वापरलात किंवा वापरण्यात आपण काही चूक केली तर निश्चितच आपले मोठे नुकसान होऊ शकते.
शेअर मार्केटिंग क्षेत्रातही भविष्यात AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे; पण हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी Software ला योग्य त्या सूचना दिल्या नाही किंवा वापरण्यात चूक झाली तर नुकसानीचा मोठा फटका बसू शकतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात AI चे तंत्रज्ञान वापरले, एवढ्यावरच न थांबता AI चे तंत्रज्ञान कौशल्याने वापरले याला भविष्यात महत्त्व राहणार आहे. भविष्यात AI चे तंत्र वापरून फेक न्यूज, फेक ऑडिओ, बँकिंग व्यवहारात फेक डॉक्युमेंट्सचा वापर करून पैशाची देवघेव. ऑनलाईन money transferation अशा अनेक क्षेत्रात हल्ला होणार आहे. त्यासाठी AI चाच वापर करून तीव्र प्रतिकार करण्याचे कौशल्या आत्मसात करणे आवश्यक आहे. AI चो दुरुपयोग करून गुन्हेगारी सुद्धा वाढणार आहे. या गुन्हेगारीवर सुद्धा आळा घालण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी असणे आवश्यक आहे.