दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये ज्याप्रमाणे विविध प्रकारची फळझाडे आढळतात, त्याचप्रमाणे विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. फुलवेली आढळतात Dolichandra unguis-cati हे एक फूल झाड असेच वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळेवेगळे आहे. या फुलझाडाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या आकारामुळे त्याला Cat’s claw creeper म्हणजेच मांजराचा पंजाचे झाड असे म्हणतात.या झाडांची फुले पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की मांजराच्या पायांचे ठसे जसे मऊमऊ मातीत उमटतात, तशाच आकाराची ही फुले आहेत.आणि त्यांचे निरीक्षण केल्यास मांजराच्या पंजासारखी दिसतात. ही फुले पिवळ्या रंगाची असून खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात. या फुलांना cat’s claw trumpet असेही म्हणतात. हे फूल झाड दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशातील मूळनिवासी असून मेक्सिको, ब्राझील, अर्जेटिना या देशातील ॲमेझॉनच्या जंगलात आढळते. हे फूलझाड जलदगतीने वाढते. फुलांच्या आकर्षक रंगांमुळे अनेक देशांत हे फुलझाड संक्रमित आणि स्थलांतरीत केलेले आहे. Cat’s claw creeper ही वनस्पती साप चावल्यानंतर विषाची तीव्रता कमी करण्यासाठी वापरतात. तसेच मलेरिया, संधिवात, आमांश, आतड्या संबंधीचे रोग बरे करण्यासाठी वापरतात.त्यामुळे ही औषधी वनस्पती आहे.या वनस्पतीचे खूप महत्त्व आहे.
