Budhha: Life, Work, Dammha:-Part 3

गौतम बुद्ध जीवन, कार्य, धम्म:-भाग 3

गौतम बुद्‌धांचे पूर्वज-Ancestors of Budhha

कपिलवस्तु ही बुद्धाच्या शाक्य घराण्याची राजधानी होय. बुद्ध पूर्व काळात बळीराजा होऊन गेला.बळीराजाच्या चुलत्याचे नाव कपिलमुनी असे होते कपिलमुनी हा खूप वि‌द्वान आणि तत्त्वज्ञानी होता. त्यानेच आश्रमव्यवस्थेविषयी आपले विचार मांडले होते. म्हणून कपिलमुनींना आश्रम‌व्यवस्थेचे जनक मानले जाते. कपिल मुनींनी सांगितलेले चार आश्रम पुढील प्रमाणे-

1 ब्रह्मचर्याश्रम:- अखंड ब्रम्हचारी राहणे. ज्ञानार्जन करणे.

2.गृहस्थाश्रम – विवाह करणे. संसार करणे, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणे.

3.वानप्रस्थाश्रम – कौटुंबिक जीवनातून मुक्त होऊन वनात जाऊन राहणे.

4.संन्यासाश्रम – सर्वस्वाचा त्याग करून भीक्षा मागून उदर‌निर्वाह करणे. सन्यस्त जीवन जगणे.

अशी आदर्श आश्रमव्यवस्था सांगणाऱ्या कपिल मुनींचे वास्तव्य या कपिलवस्तुत असावे असे मानले जाते. कपिलमुनीची मुलगी अनसूया आणि अनसूयाचा पती अत्री ऋषी यांना झालेला मुलगा म्हणजे दत्तात्रेय होय. स्वतः सन्यस्त जीवन जगून जगाला सदाचाराचे उपदेश देणारे ते दत्तात्रेय होय. कपिलवस्तुची पार्श्वभूमी अशी आहे. अशा पवित्र नगराचा राजपुत्र म्हणजेच सिद्धार्थ गौतम बुद्ध होय. या सिद्धार्थाचे पूर्वज पुढीलप्रमाणे—-

वरील वंशावळ पाहिली असता आदित्य गोत्र असलेल्या शाक्य घराण्यातील माहिती असलेला मूळ पुरुष म्हणजे जयसेन होय. त्याला सिंहनु नावाचा मुलगा होता. कच्चना ही सिंहनुची पत्नी होय या दोघांना पाच पुत्र व दोन मुली होत्या. त्यांतील ज्येष्ठ पुत्र म्हणजे शुद्धोदन राजा होय. जा शुद्धोद‌नाची महामाया ही पहिली पत्नी होय. युद्धात पराक्रम गाजवल्यामुळे महाप्रजापती या दुसऱ्या पत्नीशी विवाह करण्याची संधी त्याला मिळाली. महामाया व महाप्रजापती या दोघी सख्ख्या बहिणी व सख्ख्या जावा होत. अंजन व सुलक्षणा हे त्यांचे आईवडील होय. शुद्धोदन व महामाया यांच्यापासून सिद्‌धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला.

Leave a comment