Amazon rainforest: Red eyed tree frog

बेडूक हा उभयचर प्राणी आहे. तो पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतो. दक्षिण अमेरिकेतील भव्य, विस्तीर्ण Amazon rainforest मध्ये अनेक प्रकारचे बेडूक आढळतात. Red eyed tree frogs ही एक अशी एक बेडकाची प्रजात आहे. या बेडकांना Red eyed leaf frog असेही म्हटले जाते. खूप रंगीबेरंगी आपण दिसायला सुंदर असणारे हे बेडूक त्यांच्या चमकदार रंगांसाठी प्रसिद्ध आहेत. हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि लाल रंगाचे मिश्रण म्हणजे हे झाडावर राहणारे बेडूक होय. या बेडकाचे आणखी एक वैशिष्ट्य या बेडकाचे पुढचे आणि मागचे पाय लांब असतात.हे बेडूक निशाचर असून रात्रीच्या वेळी ते कीटक पकडून खातात.हे बेडूक आपल्या लांब जिभेच्या साहाय्याने कीटकांना पकडून खातात. या बेडकाची मादी नरापेक्षा मोठी असते. हे बेडूक बिनविषारी असतात. या बेडकांना मिळालेला हिरवा रंग पानांमध्ये लपण्यासाठी उपयोग होतो. त्याच्या लालभडक डोळ्यांमुळे भक्षक घाबरून गर्भगळीत होऊन पडतात. उष्ण कटिबंधीय प्रदेशात पाणथळ, दलदल असलेल्या प्रदेशात हे बेडूक अधिक प्रमाणात आढळतात. पतंग, डास, माश्या, टोळ, लहान लहान किडे हे त्यांचे अन्न आहे. प्रजनन कालावधीत बेडूक एकमेकात युद्ध करतात. विजेते नर प्रजननास पात्र ठरतात. मादी पानांच्या खालील बाजूस अंडी घालतात. नर ही अंडी फलित करण्याचे काम करतात.

Amazon rainforest: Poison dart frog-विषारी बेडूक

Leave a comment