Assembly Election-2024 : कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान ? पहा सविस्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024

महाराष्ट्रात मतदानाचा टक्का वाढला. तुरळक प्रकार वगळता मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले.

20 नोव्हेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे मतदान पार पडले. यावर्षी अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला, 2024 च्या विधानसभेत महाराष्ट्रात एकूण 65 टक्के मतदान झाले, दुपारी 3 वाजेपर्यंत 45% टक्के मतदान झाले होते. यांत सर्वाधिक गडचिरोली जिल्हयात 61% मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत 58 % मतदान झाले. मतदानाच्या दिवशी घडलेले तुरळक प्रकार वगळता महाराष्ट्रातील मतदान शांततेत आणि उत्स्फूर्तपणे पार पडले.

बारामतीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घड्याळालाच मतदान करण्यासाठी दमदाटी केल्याची तक्रार युगेंद्र पवार यांनी केली. नाशिकमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परळीत एका मतदान केंद्रात कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची तक्रार नोंद, बराच काळ मतदान ठप्प होते.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी :

।) यवतमाळ – 69.02%

2) मुंबई – 52.07%

3) पुणे – 60.70%

4) कोल्हापूर – 76.25%

5) संभाजीनगर- 68.83%

6) अकोला 62.23%

7) नागपूर – 60.69%

8) सांगली – 71.79%

9) सातारा – 71.71%

10) सोलापूर – 67.36%

11) बुलढाणा- 70.32%

12) ठाणे – 56.05%

13 धुळे- 64.70%

14) चंद्रपूर – 71.27%

15) गडचिराली -73.68%

16) रत्नागिरी -64.65%

17) सिंधुदुर्ग- 63.98%

18) गोंदिया- 69.53%

19) मुंबई उपनगर- 55-77%

20) पालघर -65.95%

21) नांदेड- 64.92%

22) बीड- 65.71%

23) धाराशिव- 64.27%

24) जळगाव- 64.42%

25) नंदूरबार – 69.75%

26) नाशिक – 67.57%

27) लातूर- 66.92%

28) परभणी- 70.38%

29) वर्धा – 68.30%

30) भंडारा – 69.44%

31) जालना – 72.30%

32) गोंदिया -65%

33) हिंगोली -71.70%

34) रायगड – 67.23%

35) वाशिम – 66.01%

36) अमरावती – 58.70%

Leave a comment