साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
लुइजी पिरांडेलो
Luigi Pirandello
जन्म: 28 जून 1867
मृत्यू: १० डिसेंबर १९३६
राष्ट्रीयत्व : इटालियन
पुरस्कार वर्ष: 1934
लुइजी पिरांडेलो हे इटलीचे एक उत्कृष्ट नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या अनेक कथांचे नाट्य रूपांतर करून ते नाटक रंगमंचावर सादर केले. त्यांनी मुसोलिनीकडून आर्थिक मदत घेऊन ‘नॅशनल आर्ट थिएटर ऑफ रोम’ची स्थापना केली. त्यांच्या नाटकांचे लंडन आणि न्यूयॉर्क येथील रंगमंचावर प्रयोग झाले. त्याचा परिणाम असा झाला की ते लोकप्रियतेच्या शिखरावर गेले आणि त्यांना १९३४ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.