दिल्लीचे वाढते प्रदूषण रोखणार का ? Will Delhi Prevent the Increasing Pollution?
भारतातील सर्वच दाट लोकवस्तीच्या शहरांत प्रदूषणाचा विळखा वाढत आहे. वाहनांची वाढती गर्दी हे त्यांतील प्रमुख कारण आहे. भारताची राजधानी असलेले शहर म्हणजे दिल्ली या शहराला प्रदूषणाचा सर्वांत जास्त फटका बसत आहे. थंड हवा,दाट धुके आणि त्यात मिसळलेले प्रदूषित वायूंचे कण यांमुळे 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2024 मध्ये दिल्लीची जनता दूषित वातावरणामुळे – पूर्णतः हैराण झालेली दिसली. 20 नोव्हेंबर 2024 रोजी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) म्हणजेच Air Quality Index 488 च्या वर गेल्याचे दिसले. दिल्लीत प्रदूषणाचा दर्जा तपासणारी एकूण 32 केंद्रे आहेत. त्यापैकी सर्वच केंद्रात AQI 480 च्या वर आढळला. त्यामुळे संपूर्ण दिल्लीतच हवा प्रदूषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीत श्वसनाचे आजार वाढले:
दिल्लीतील वाढते प्रदूषण ही काही ठरावीक दिवसांची समस्या नाही. दिल्लीतील हवा वर्षभर प्रदूषितच असते. त्यामुळे दिल्लीतील लहान मुले, वृद्ध माणसे, आजारी माणसे यांचे आरोग्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दिल्लीत सर्वांत जास्त श्वसनाचे आजार असलेले रुग्ण आढळेत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर दिल्लीत राहणे मुश्कील होऊन जाईल. या गोष्टीकडे ना केंद्र सरकार, ना जनता, ना राज्य सरकार गांभीर्याने बघत आहे. देशाचे सध्या अस्तित्वात असलेले केंद्र सरकार धर्मांधतेत गुंतले आहे. आपली पत देशविदेशात निर्माण करण्यासाठी धडपडत आहे.पण प्रदूषण रोखण्यात आपला देश 169 वा आहे.हे सरकारला कधी कळेल.राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राचे वारंवार हल्ले होत आहेत. त्यामुळे राज्य सरकार ठोस उपाय योजना करण्यात अयशस्वी झाले आहे. जनता बेफिकीर आहे. त्यांना आपण करत असलेल्या प्रदूषणाची जाणीव नाही.
दिल्लीतील हवा प्रदूषणाचे कारण काय ? What is the cause of air pollution in Delhi?
1 दिल्लीत पेट्रोलियम वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे.
2 दिल्लीमध्ये दररोज 8000 मेट्रिक टन घनकचरा तयार होतो. त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यास सरकार, केंद्रसरकार अयशस्वी ठरले आहे.
3 सध्या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जे बांधकाम चालू आहे लामुळे धूळ उत्पन्न होते. या धुळीमुळे PM-10 आणि PM-2.5 चे हवेतील प्रमाण 50% ने वाढले आहे.
4 चेन्नईमध्ये प्रचंड वाहने असूनही दिल्लीच्या तुलनेत चेन्नईला AQI खूप कमी आहे. म्हणजेच खूप चांगला आहे. याचे कारण चेन्नई समुद्र किनारी आहे. त्यामुळे खारे आणि मतलई वारे चेन्नईचे प्रदूषण कमी करण्यास मदत करते. तशा पद्धतीची भौगोलिक रचना दिल्लीत नाही.
5 जीवाश्म इंधनाच्या अति वापरामुळे दिल्लीतील हवेत मोठ्या प्रमाणात हानीकारक वायू मिसळत आहेत.
6 हरितगृह वायूंचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन वाढले आहे.
7 सणसमारंभाच्या वेळी वापरलेल्या फटाक्यांमुळे दिल्लीत वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे.
वायू प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या- Problems caused by air pollution:
1) हवा प्रदूषणामुळे मुलांचे वजन कमी होणे, क्षमरोग, दमा, हृदयरोग, स्वरयंत्राचा कर्करोग फुफ्फुसाचा कर्करोग याचे प्रमाण वाढले आहे.
2) वायुप्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षाखालील 6,00,000 मुलांचा मृत्यू होत आहे.
3) जगभरात वायूप्रदूषणामुळे 25,00,000 लोक मृत्युमुखी पडतात.
५) हरितगृह वायूमुळे तापमानवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे.
वायू प्रदूषणावर उपाय- Solutions to air Pollution
1) शहरातील वाढत्या वाहनांची गर्दी रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. वैयक्तिक वाहनांच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे.
2) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे काटेकोरपणे नियोजन करून लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
3) सार्वजनिक बसेस सुद्धा E-buses असणे आवश्यक आहे.
4) बांधकामामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन PM-10 व PM2.5 च्या निर्मितीला आळा घातला पाहिजे.