Amazon Rainforest: Boa

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये जसे विषारी साप आढळतात, तसेच बिन-विषारी सापही आढळतात. Boa हा असाच एक बिनविषारी साप आहे. दक्षिण अमेरिकेतील सुप्रसिद्ध ॲनाकोंडा हा बोआ सापाचा एक प्रकार आहे. बोआ हा एक मांसल साप असून त्याचे शरीर जाडजूड असते. या सापाची हालचाल मंद असल्याने त्याची शिकार करणे सोपे जाते. हा साप आपले भक्ष्य पकडून त्याला वेटोळे घालून गुदमरून मारतो आणि नंतर आरामात खातो. भक्ष्य लहान असेल तर तो तोंडाने पकडून गिळतो. बोआच्या जबड्यात प्रचंड शक्ती असते. या सापाच्या बोआ कंस्ट्रक्टर, बोआ इम्पेरेटर, बोआ नेब्युलोसा, बोआ ओरॉफियास, बोआ सिग्मा, बोआ अटलांटिका इत्यादी प्रजाती आहेत.हे साप 27 ते 30 किलोग्रॅम पर्यंत असू शकतात. दक्षिण अमेरिकेतील मक्सिको, मध्य अमेरिका, उत्तर अमेरिका, मध्य- दक्षिण अमेरिकेतील बेटांवरची हे बोआ साप मोठ्या प्रमाणात आढळतात. हा बोआ साप अंडज वर्गातील सरपटणारा प्राणी असून तो एका वेळी 30 ते 80 अंडी घालतो.

Amazon Rainforest : Anaconda.

Leave a comment