Amazon Rainforest: Capped Heron: कॅप्ड हेरॉन

दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये डोक्याच्या पाठीमागे शेंडीसारखा लांबलचक लोंबकळणारा तुरा असणारा असणारा एक आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे capped Heron होय. पाण्याजवळच अधिवास असल्यामुळे या हेरॉन पक्ष्याला water-bird असे म्हणतात. पिल्हेरोडियस वंशातील ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही एक बगळा वर्गातील प्रजाती असून इतर प्रजातीहून वेगळी आहे. आकाशी-निळ्याची चोच आणि डोक्यावर काळा मुकूट हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. फिकट क्रिमी रंगाचे पंख त्याला खुलून दिसतात. पोट, छाती, मान जवळजवळ त्याच रंगाचे आहेत. या पक्ष्यांची सरासरी लांबी 55 सेमी असते. डोक्यावरून निघालेली पंखांची तार 26 सेमी लांब असते. वजन सुमारे 500 ग्रॅम असते. सुरीनाम आणि व्हेनेझुएला या देशांच्या पाणथळ भागात हे पक्षी अधिक प्रमाणात आढळतात. या पक्ष्यांचे मुख्य अन्न म्हणजे मासे होय. याशिवाय पाण्यातील किडे, अळ्या, लहान बेडूक ते शिकार करून खातात. या पक्ष्यांच्या मादी 2 ते 3 अंडी घालतात. त्यामुळे हेरॉन पक्ष्यांची संख्या झपाट्याने वाढत नाही.

Amazon forest: Hoatzin: हॉटझिन

Leave a comment