फेंगल या चक्रीवादळाचे सावट महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ? अर्ध्याहून अधिक भारत फंगल मुळे झाकोळला
27 नोव्हेंबर 2024 रोजी अंदमानच्या समुद्रात उगम पावलेल्या फेंगल वादळाचे सावट केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश ,पश्चिम बंगाल, बिहारसह महाराष्ट्रातही पसरले आहे. संपूर्ण दक्षिण भारतात स्वच्छ सूर्यप्रकाशाचा अभाव दिसत आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून अजूनही फेंगलचे सावट कायम असल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्वच्छ सूर्य प्रकाशाच्या अभावामुळे हवेतील जीवजंतूचे प्रमाण वाढणार असून लहान मुले, आजारी माणसे यांना अशा हवेतून फिरवणे जास्तीत जास्त टाळावे. मास्क वापरून मुलांना शाळेत पाठवले तर रोगांपासून मुलांचे संरक्षण होईल. सर्वांनीच मास्क वापरणे आवश्यक आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप इत्यादी विकार जडण्याची शक्यता आहे.
फेंगलचा परिणाम पिकांवरही:
आकाशात दाट मळभ पसरल्यामुळे हरभरा, वाटाणा, तूर, पावटा ,फळभाज्या, पालेभाज्या इत्यादी पिकांना चांगलाच फटका बसणार आहे. अशा वातावरणात कीड फोफावते. अशी कीड पिकांचे नुकसान करते. म्हणूनच फेंगलचे खरे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. आंब्यांना आलेला मोहर गळण्याची शक्यताही अधिक असल्याने कोकणातील आंबे उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. फेंगलचा परिणाम अजून किती दिवस राहील निश्चित सांगता येत नसले तरी नजीकच्या तीन-चार दिवसांत हवेतील वातावरण स्वच्छ होईल असे वाटत नाही.