आधुनिक जीवनशैलीमध्ये, तणाव आणि बैठ्या कामाचे प्रमाण जास्त वाढले आहे. संपूर्ण शरीराला चालना देणारा आणि मानसिक ताजेपणा देणारा सूर्यनमस्कार हा एक उत्कृष्ट व्यायामप्रकार आहे. सूर्यनमस्कार हे एक अत्यंत प्रभावी योगासन आहे जे आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे देतो. नियमित सूर्यनमस्काराने शरीर आणि मनाला एक नवीन ऊर्जा मिळते. ज्यामुळे तुम्ही निरोगी आणि शांत राहू शकता.
सूर्यनमस्काराचे फायदे: Benefits of Surya namaskar
सूर्यनमस्कार हा एक संपूर्ण शारीरिक आणि मानसिक व्यायाम आहे. यामध्ये 12 आसनांचा समावेश आहे. सूर्यनमस्काराचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे अनेक फायदे आहेत. योगासनांमध्ये अनेक आसनांचा समावेश आहे. त्यातीलच एक असं म्हणजे सूर्यनमस्कार होय. याचे वैशिष्ट्यपूर्ण फायदे आपण जाणून घेणार आहोत.
शरीर लवचिक बनवते :Improves Flexibility
नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे स्नायू ताणतात आणि मजबूत होतात. पाठीचा कणा आणि सांध्यातील जडपणा कमी होण्यास मदत होते. यामुळे लवचिकता वाढण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारते:Improves heart health
नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे हृदयाची गती वाढते. ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत: helps with weight loss
सूर्यनमस्कार केल्यामुळे शरीरातील चरबी जळते .ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते .
ताण आणि चिंता कमी होते . नियमित सूर्यनमस्कार केल्यामुळे ताण कमी होतो आणि मन शांत होते. सूर्यनमस्कार मुळे चिंता कमी होते आणि आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
एकाग्रता वाढते: Improves Concentration
सूर्यनमस्कार हा श्वासावर लक्ष ठेऊन व्यायाम केला जातो .त्यामुळे एकाग्रता वाढते आणि आपले मन ताजे राहते.
रोग प्रतिकारशक्ती सुधारते: Boosts Immunity
सूर्यनमस्कारामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. आणि अनेक रोगांपासून आपला बचाव होतो.
जसे की डायबिटीज, उच्च रक्तदाब कमी होऊन हृदय निरोगी राहते.
वृद्धापकाळावर नियंत्रण:
सूर्यनमस्कारामुळे शरीराचे ताजेपणा कायम राहतो. त्वचेला ताजेपणा मिळतो. आपला मूड चांगला राहण्यास मदत होते.आणि आपण चिरतरुण राहतो.