Irrigation in Maharashtra महाराष्ट्रातील जलसिंचन

(1) पाण्याचा गंभीर प्रश्न: Serious Issue of water

पृथ्वीवर 97% पाणी खारट व 2% पाणी बर्फरूपात आहे. त्यामुळे 1 % पाणीच मानवी कल्याणासाठी वापरता येते. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. 2015 साली पाऊस खूपच कमी पडल्यामुळे 1972 सालच्या दुष्काळाची आठवण साऱ्या महाराष्ट्रीयांना 2016 साली झाली.

तीव्र पाणीटंचाईपासून मुक्ती मिळण्यासाठी पाण्याचे पुनर्नियोजन करणे आवश्यक आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

(2) कृत्रिम पाऊस : ढगांवर सिल्व्हर ऑक्साईडचा फवारा मारून

कृत्रिम पाऊस पाडला जातो. अशा प्रकारचा पाऊस 2003 साली सातारा जिल्ह्यातील वडूज, मायणी परिसरात पाडला होता. असा पाऊस पाडणे खूप खर्चीक बाब असते.

(3) पाणी साठवण्याच्या पद्धती :Methods of Water Storage

(A) विहीर :Well

‘विहीर’ ही पूर्वापार चालत आलेली पाणी साठवून ठेवण्याची पद्धत आहे. विहिरीतील पाण्याची साठवण भूगर्भातील पाण्याच्या स्रोतावर अवलंबून असते.

(B) तळी : Tali

जमीन खणून तळी तयार केली जातात. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणी तळी आहेत.

(C) नाला बंडिंग: Drain Bunding

डोंगर उतारावरून येणारे पावसाचे पाणी अंतरा अंतरावर बंधारे बांधून अडवले जाते याला ‘नाला बंडिंग’ म्हणतात.

(D) धरणे : Dams

लहान-मोठ्या नद्यांवर धरणे बांधून पाणी अडवले जाते.

(E) छोटे बंधारे :Small Dams

लहान-लहान ओढे, नाले अडविण्यासाठी बांधलेल्या कमी उंचीच्या बंधाऱ्यांना ‘छोटे बंधारे’ म्हणतात.

(F) रेन वॉटर हार्वेस्टिंग : Rain water harvesting

घराच्या छपरावर पडलेले पाणी पाण्याच्या टाक्यांमधून साठवले जाते. अशा पद्धतीच्या पाणी साठविण्याच्या पद्धतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग’ म्हणतात. गुजरात, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रातही रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

(G) शिवशाही पाणीपुरवठा योजना : Shivshahi Water Supply Scheme

2001/2002 साली महाराष्ट्र शासनाने ‘शिवशाही पाणीपुरवठा’ योजनेचा पुरस्कार केला. शिवकाळात आणि तत्पूर्वी ज्या पद्धतीने पाणी साठविले जाते त्याप्रमाणे काही ठिकाणी कातळ खडक खोदून पाणी साठविले जाते.

महाराष्ट्रातील शेतीसाठी जलसिंचनाच्या विविध पद्धती :Different methods of irrigation for agriculture in Maharashtra

(1) उपसा सिंचन पद्धत :Upsa irrigation method

खोल भागात (नदीत, विहिरीत वगैरे) असलेले पाणी विद्युत पंपाच्या साहाय्याने उंच भागात असलेल्या शेतजमिनीसाठी पाणी पुरविले जाते. या पद्धतीला ‘उपसा सिंचन पद्धत’ म्हणतात.

(2) ठिबक सिंचन पद्धत : Drip irrigation Method

पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी रोपाच्या मुळाशी सूक्ष्म छिद्रे पाडलेल्या पाईपद्वारे पाणी पुरवले जाते. अशा पद्धतीला ‘ठिबक सिंचन पद्धत’ म्हणतात. वनस्पतीला थेंब थेंब पाणी दिले जाते. या पद्धतीमुळे पाण्याचा काटकसरीने वापर होतो.

(3) तुषार सिंचन पद्धत : Frost irrigation method

या पद्धती लहान व्यासाच्या पाईपमधून पाण्याला विशिष्ट दाब देऊन नॉझलद्वारे पिकांवर तुषार रूपात पाणी दिले जाते. या पद्धतीत पाणी वर्तुळाकार व समप्रमाणात पाणी शिंपडले जाते. या पद्धतीला फवारा सिंचन पद्धत, सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत असेही म्हटले जाते.

(4) प्रवाही सिंचन पद्धत :Flow irrigation method

धरणाच्या साठ्यातील पाणी कालवे, उपकालवे याद्वारे शेतीला पुरविले जाते. त्याला ‘प्रवाही सिंचन पद्धत’ म्हणतात. प्रवाही सिंचन पद्धतीत प्रामुख्याने पुढील प्रमुख पद्धती आहेत.

1) मोकाट पद्धत Free Method

2) सारा पद्धत

3) सरी व वरंबा पद्धत Sari and Varamba Method

4) आलटून-पालटून पाणी देणे.Alternative Method

5) वाफा पद्धत Vafa Method

6) साखळी पद्धत Chain Method

Leave a comment