निरोगी राहण्यासाठी नियमित फळांचे सेवन करणे आवश्यक आहे . वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फळे खाणे फायदेशीर ठरते. यापैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे किवी .डेंग्यूमुळे रक्तीतील प्लेटलेट्सची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होते.अशा रुग्णांना किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. किवी रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करते .चवीला आंबट-गोड असणारं किवी फळाचे फायदे आपण जाणून घेऊया.
1. किवी आणि हृदयाचे आरोग्य
किवी नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. किवीमध्ये फायबर्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
2. पचन क्रिया सुधारते:
किवीमध्ये फायबर्स आणि सक्रिय एंजाइम जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाचे आरोग्य चांगले राहते. हे फळ पचनशक्तीला उत्तेजन देऊन constipation , गॅस, आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळवतो.
3. त्वचेसाठी फायदेशीर:
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असतात.जे त्वचेच्या आरोग्याला खूप फायदेशीर असतात. किवी त्वचेला चमकदार (ग्लोइंग) करण्यास खूप मदत करते. व्हिटॅमिन C चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते कोलेजनचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे त्वचेला लवचिकता मिळते. चेहऱ्यावरील डाग आणि मुरुमांच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
4. डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर:
वय वाढल्यावर दृष्टी कमी होऊ लागते आणि डोळ्यांच्या अनेक समस्या चालू होतात . डोळे चांगले राहण्यासाठी किवी हे फळ खूप फायदेशीर आहे.
किवीमध्ये ल्यूटिन आणि झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. किवी मध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांतील जळजळ आणि लालसरपणा दूर करतात.
५. झोप सुधारण्यास मदत:
किवीमध्ये सेरोटोनिन हा घटक असतो. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. नियमित किवी खाल्ल्यामुळे चांगली झोप मिळते आणि ताजेपणा वाढतो.
6. रोगप्रतिकारक शक्ती वाढते:
किवीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C जास्त प्रमाणात असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किवी हे फळ अत्यंत उपयोगी आहे. नियमित तुम्ही एक किवी खाल्ली तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते आणि आपले आरोग्य चांगले राहते . यामुळे सर्दी, फ्लू, आणि इतर संसर्गापासून बचाव होतो.
7. मधुमेह नियंत्रण:
किवी मध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात .जे मधुमेहाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी उपयोगी असतात. मधुमेह असेल तर किवी नियमितपणे खाणे फायदेशीर असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते आणि ती वेगाने वाढत नाही.