साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
यासुनारी कावाबाटा
Yasunari Kawabata
जन्म: 11 जून 1899
मृत्यू : 16 एप्रिल 1972
राष्ट्रीयत्व : जपानी
पुरस्कार वर्ष: 1968
यासुनारी कावाबाटा या जपानी साहित्यिकाला प्रथमच नोबेल पारितोषिक मिळाले. त्यापूर्वी कोणत्याही जपानी साहित्यिकाला हा पुरस्कार मिळाला नाही. भावनाप्रधान लेखन हा त्यांच्या विषयाचा गाभा होता. त्यांच्या अनेक कथा इंग्रजी भाषेत अनुवादित झाल्या होत्या. ‘स्नो कंट्री’ ही त्यांची कादंबरी खूपच गाजली. ‘थाउजंड क्रेन्स’ ही कादंबरी शृंगारप्रधान आहे. ‘साउंड ऑफ माउंटन’ ही कादंबरी सुद्धा खूपच लोकप्रिय होती.