मेडिटेशन म्हणजे काय ? What is Meditation?
दररोजच्या धकाधकीच्या आणि जीवनशैलीत मेडिटेशन करणे खूप साधनेचे(ध्यान) प्रकार आहे. मेडिटेशन केल्यामुळे शरीर आणि मनाला विश्रांती मिळते. मेडिटेशन म्हणजे ध्यान किंवा साधना होय. मन आणि शरीर शांत करण्याची ही एक प्राचीन पद्धत आहे. ध्यानाद्वारे आपण आपल्या विचारांवर, भावना, श्वासोच्छवास, किंवा विशिष्ट उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतो. ध्यानाद्वारे मनाचे ताणतणाव कमी करून अंतर्मनाला शांती प्राप्त करता येते. ध्यानाचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारचे वेगळे फायदे आहेत . ध्यानाचे प्रकार आपल्या गरजेनुसार निवडता येतात. आपण ध्यानाचे विविध प्रकार आणि फायदे जाणून घेऊया
मेडिटेशन चे विविध प्रकार : Kinds of Meditation
१. मंत्रध्यान (Mantra Meditation)
मंत्रध्यानामध्ये एक विशिष्ट मंत्र किंवा शब्दाचे उच्चारण केले जाते आणि त्यावर लक्ष केंद्रित केले जाते. एक मंत्र अनेक वेळा उच्चारण करून मानसिक शांती आणि एकाग्रता साधतात. हे ध्यान खास करून भारतीय प्राचीन हिंदू आणि बौद्ध परंपरेत प्रचलित आहे.
2. माइंडफुलनेस मेडिटेशन :Mindfulness Meditation :
हा एक बौद्ध ध्यान प्रकार आहे. यामध्ये वर्तमान क्षणात पूर्णपणे उपस्थित राहून कोणत्याही भूतकाळाच्या आठवणी किंवा भविष्याच्या चिंतांचा विचार न करता, त्यांच्या चालू क्षणातील अनुभवांवर लक्ष केंद्रित करतात. जेव्हा आपण वर्तमान क्षणात उपस्थित राहतो, तेव्हा मानसिक ताण, चिंता आणि दबाव कमी होण्यास मदत होते .
3. स्मरणध्यान (Concentration Meditation)
स्मरणध्यान (Concentration Meditation) हा एक अत्यंत प्रभावी आणि साधा ध्यान प्रकार आहे. स्मरणध्यान म्हणजे मनाची एकाग्रता एका ठराविक बिंदूवर ठेवतात. या प्रकारात बिंदू, ध्वनी, श्वास किंवा मंत्रावर एकाग्रता ठेवली जाते. स्मरणध्यानामुळे आपली एकाग्रता वाढते. यामुळे तुमचं लक्ष केवळ एका गोष्टीवर केंद्रित होते. यामुळे आपले मन शांत होते आणि चिंता आणि ताण कमी होण्यास मदत मिळते.हे आपल्या दैनंदिन जीवनात ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.
4. प्राणायाम ध्यान (Pranayama Meditation)
प्राणायाम ध्यान (Pranayama Meditation) हा एक श्वासावर आधारित ध्यान प्रकार आहे. “प्राणायाम” म्हणजे “प्राण” (जीवनशक्ती) आणि “आयाम” (नियंत्रण) यांचा मिलाफ आहे. यामध्ये श्वास घेणे, थांबवणे आणि सोडणे यावर लक्ष केंद्रित करून शरीर आणि मानसिक एकाग्रता आणि शांति साधता येते. प्राणायाम ध्यानामुळे मानसिक ताण-तणाव कमी होतो, आणि मनाला शांती मिळते . श्वासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे एकाग्रता वाढते.प्राणायाम ध्यानामुळे आपल्या भावनांचा संतुलन साधता येतो.
5.मार्गदर्शित ध्यान (Guided Meditation):
मार्गदर्शित ध्यानामध्ये एक ध्यान प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक एक शांतीपूर्ण वातावरणात ठेवतो आणि त्याला विशिष्ट ध्यान तंत्रांचा उपयोग करून शारीरिक आणि मानसिक शांती साधायला मदत करतो. यामध्ये आवाज, शब्द, कल्पना किंवा दृश्यांचा वापर करून साधकाचे मन शांत करण्यात मदत केली जाते.
मार्गदर्शित ध्यानामुळे मानसिक ताण आणि चिंता कमी होतात. या ध्यानामुळे सकारात्मक विचार आणि भावना निर्माण होतात. मार्गदर्शित ध्यानाने आत्मविश्वास वाढवतो. मार्गदर्शित ध्यानामुळे शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळते.