21/22 December the smallest day in the Northern Hemisphere? 21/22 डिसेंबर – सर्वात लहान दिवस ?

पृथ्वीची स्वतःभोवतीची आणि सूर्याभोवतीची फिरण्याची कक्षा नेहमी बदलत असते. पृथ्वीच्या स्वतःभोवताली (परिवलन) फिरण्याच्या गतीमुळे दिवसरात्र होतात.

21/22 डिसेंबर रोजी सूर्याचे स्थान मकरवृत्तावर असते.मकरवृत्त दक्षिण गोलार्धात 23.5 अक्षवृत्तावर आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धात थंडी पडते. तर दिवस ही लहान असतो व रात्र मोठी असते. 21/22 डिसेंबर हा उत्तर गोलाधर्धातील सर्वांत मोठी रात्र असलेला व सर्वांत लहान दिवस असलेला दिवस असतो. याचे कारण म्हणजे सूर्य उत्तर गोलार्धापासून दूर म्हणजे सर्वात दूर गेलेला असतो. गंमत अशी की 21 किंवा 22 डिसेंबर रोजी दक्षिण गोलार्धात दिवस मोठा तर रात्र लहान असते.

भारतात सर्वसाधारणपणे 21 किंवा 22 डिसेंबर दिवशी 13 तासाहून अधिक काळाची रात्र असते, तर 11 तासाहून कमी कालावधीचा दिवस असतो. सूर्य दक्षिण गोलार्धात’ असल्याने या काळात भारतात आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. थंडीचे प्रमाण अधिक असते.

Leave a comment