Buddha Life Story-Part 24 :सिद्धार्थ गौतमाचे शोकाकुल कुटुंब

सिद्धार्थ गौतमाचा सेवक तथा सोबती छन्न पर‌तण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शुद्धोदन आणि गौतमीची निराशा झाली होती. त्यांनी शेवटचा प्रयत्न छन्नवर सोपवला होता ,पण छन्नही रिकाम्या हातांनी मागे परतला.

कंटक घोडाही अस्वस्थ अवस्थेत अश्वशाळेत परतला होता.तो जोरजोरात खिंकाळत होता. राजगृहातील अनेक स्त्रिया दुःखावेगाने मूर्च्छित झाल्या होता. गौतमीची अवस्था तर खूपच वाईट झाली होती. अनेक स्त्रिया आशाळभूत नजरेने राजवाड्याबाहेर आल्या होत्या.त्यात प्रजापती पण होती, पण त्यांच्या आशेवर पाणी पडले होते. सेवक छन्न आणि रात्रपुत्राचा रिकामा घोडा पाहून सर्व स्त्रियांनी आक्रोश केला. गौतमीचा मनावरील ताबा सुटला होता. तिनेही मोठ्याने हंबरडा फोडला. सर्वगुणसंपन्न असा राजपुत्र आपल्यातून निघून गेल्याने सर्वांनाच हे दु:ख पचवणे जड जात होते.

“जो राजपुत्र सामर्थ्यशाली आहे, दानशूर आहे, तो आता कशी काय भिक्षा मागणार ? जो महालात सजवलेल्या शयनगृ‌हा झोपत असे, तो आता वनात पर्णकुटीत कसा काय झोपणार? त्याला झोप लागेल का?” असा याक्रोश प्रजापती करत होती

गौतमाला संन्यास घ्यायला आणि वनात राहायला प्रोत्साहन देणारी यशोदरा आता मूर्च्छित पडली होती. तिचेही मन सुन्न झाले होते. ” मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे काय सोडून गेले? मला त्यांनी तरुण वयातच विधवा करून सोडले आहे. त्यांनी आपल्या नवीन जीवनप्रवासाची भागीदारीण करायला हवे होते. मला स्वर्गप्राप्तीची इच्छा नाही; पण पतीसमवेत मला सगळे आयुष्य कंठायचे होते. पुत्र राहूलने पित्याच्या मांडीवर खेळू नये काय ? किती निष्ठूरपणे तुम्ही हा निर्णय घेऊन मला दुःखसागरात ढकलून दिलेत?” यशोदरेचा आक्रोश पाहून सर्वांनाच हुंदके येत होते.

“माझ्या नवऱ्याला संन्यास घ्यायला प्रोत्साहन देताना असे कसे माझे हृदय कठोर झाले ? आता मी काय करु ? मला हे दुःख सहन होत नाही” असे म्हणून यशोदरा पुन्हां मूर्च्छित होऊन पडली.

राजा शुद्‌धोदनाच्या राजवाड्यात असा कित्येक दिक्स शोक चालू होता. राजवाड्यात कुणालाही अन्न गोड लागते नव्हते.

Leave a comment