Economist Prime Minister Manmohan Singh :अर्थतज्ज्ञ पंतप्रधान – डॉ. मनमोहनसिंग 

भारताचे माजी पंतप्रधान जगविख्यात अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहनसिंग यांचे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले . कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करणारे, प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणारे, देश अडचणीत असताना एक कुशल अर्थतज्ज्ञ म्हणून भूमिका घेणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अखेर काळाच्या पडद्याआड गेले. भारत देशासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेले योगदान देश कधीच विसरणार नाही.

डॉ मनमोहनसिंग यांची राजकीय कारकीर्द: Political career of Dr. Manmohan Singh

पंजाब वि‌द्यापीठात आणि दिल्ली येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहात असताना त्यांच्या ज्ञानाची आणि बुद्धिम‌त्तेची दखल भारत सरकारने घेतली. भारत सरकारच्या सचिवालयात डॉ. मनमोहन सिंग अर्थविषयक सल्लागार म्हणून काम करू लागले. त्यांची चुणूक पाहून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 1972 साली अर्थ मंत्रालयात मुख्य सल्लागार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची नेमणूक केली. पुढे ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर झाले. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून ही ते काम करु लागले.

1991 साली देशाची आर्थिक स्थिती खूप नाजूक होती. अशा कठीण परिस्थितीत भारत सरकारने अर्थमंत्रिपदाचा कारभार डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर सोपवला. 1991 ते 1996 या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी एक कुशल अर्थमंत्री म्हणून म्हणून कारभार पाहिला. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती चांगलीच सुधारली.

1998 ते 2004 या काळात डॉ. मनमोहनसिंग यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची कणखर भूमिका पार पाडली. विरोधकांवर जहरी टीका न करता त्यांनी देशाची आर्थिक स्थिती कशी सुधारावी यांविषयी त्यांनी सरकारला मार्गदर्शन केले. वेळोवेळी सल्ले दिले.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग [2004 ते 2014]: Prime minister Manmohan sing

22 मे 2004 रोजी एक अर्थतज्ज्ञ, कोणते ही राजकीय वलय नसलेला, निःस्पृह निष्कलंक माणूस देशाला पंतप्रधान म्हणून लाभला. डॉ. मन‌मोहनसिंग यांनी दहा वर्षे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करून देशाची आर्थिक स्थिती मजबूत केली.भारत अमेरिका यांच्यात अणुकरार घडवून आणून त्यांनी सक्षमीकरणात क्रांतीचे पाऊल टाकले. तसेच अर्थविषयक एका पेक्षा एक चांगले निर्णय घेऊन ते भारतीय मजबूत अर्थव्यवस्थेचे जनक बनले. आपल्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाचे त्यांनी कधीच राजकीय भांडवल केले नाही की सतत कॅमेराच्या पुढेपुढे मिरवले नाहीत. सध्याच्या राजकारणात केवळ फेकूगिरी आणि चिखलफेक चालू आहे, यांतील त्यांनी काहीही केले नाही. जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेला चालना देऊन डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर केली.

डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेले सकारात्मक निर्णयःPositive decisions taken by Dr. Manmohan Singh

डॉ. मनमोहन सिंग हे दूरदृष्टी असलेले पंतप्रधान होते, त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात काही सकारात्मक निर्णय घेतले. त्यांचा आपण आढावा घेऊ.

माहितीचा अधिकार-Right to Information

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार देशातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही शासकीय कार्यालयातील आपल्याला हवी असलेली शासकीय माहिती केवळ 10 रुपयांच्या स्टँप – तिकीटावर मिळवू शकते. या मिळालेल्या माहितीच्या आधारे तो चुकीच्या माहितीबद्दल किंवा ‘कारभाराबद्‌दल एखाद्या व्यक्तीविरुद्ध किंवा कार्यालयाविरूद्ध तक्रार करू शकतो.

माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकाला मिळालेला एक पॉवरफुल हक्क आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आणि नागरिकांना हक्काच्या माहितीसाठी हा कायदा खूप उपयुक्त ठरला आहे; पण त्यासाठी लोकशाही प्रधान सरकार हवे.

आर्थिक सुधारणा. Economics Reforms:

1991 साली काँग्रेस सरकार सत्तेवर आले, त्यावेळी भारताची आर्थिक स्थिती खूपच नाजूक होती. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था कोलमडते की काय? अशी स्थिती असताना सोनिया गांधी यांनी सरकारला मनमोहनसिंग यांच्याकडे अर्थ मंत्रिपद द्या, असे सुचवले. त्यावेळी मनमोहन सिंग खासदारही नव्हते; पण सोनिया गांधी कौटुंबिक दुःखात असतानाही त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतला . या एका निर्णयामुळे सरकारची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. मनमोहनसिंग यांनी लायसन्स राज संपवून अर्थव्यवस्था सुधारली; पण या गोष्टीचे ना सरकारने, ना मनमोहनसिंगने कधीच भांडवल केले नाही. एवढ्या आर्थिक सुधारणा करूनही 1996 साली काँग्रेसचे सरकार पडले,

रोजगार निर्मिती:Employment generation

लोकांच्या हातात थेट पैसे देणे हे प्रगतीचे लक्षण नाही. तर केवळ सत्ता काबीज करण्यासाठी दिलेली ती लाच आहे. मनमोहन सिंग हे स्वतः अर्थतज्ज्ञ होते.त्यांनी लाडकी बहीणसारखी सरकारचे आर्थिक कंबरडे मोडणारी कोणतीही योजना लागू न करता ग्रामीण भागात रोजगार निर्मिती उपलब्ध करून दिली. त्यामुळे लाखो हातांना काम मिळाले. इकडे विकास कामेही झालीत आणि लोकांना रोजगारही मिळाला. म्हणूनच मनमोहन‌सिंग यांना दूरदृष्टी असलेला पंतप्रधान असे म्हटले जाते. मनरेगा योजना ही रोजगार हमी योजनेतीलच एक भाग आहे . मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा होय.[ Mahatma Gandhi National Rural Employment Act]

अन्न सुरक्षा कायदा: Food Security Acts

मनमोहन सिंग हे सोनिया गांधी आणि राहूल गांधी अंच्या हातातील कळसूत्री बाहले असा त्यांच्यावर उपका ठेवला जातो, पण एकापेक्षा एक जैनहिताचे चांगले निर्णय कठपुत्री बाहुले घेऊ शकते का? याचा विचार करण्याइतकी भारतीय लोकशाही प्रगल्भ झालेली नाही. मंदिर, मशिद, चर्च बांधणे हे राष्ट्राचे ध्येय असू शकत नाही, तर देशाचा आर्थिक कणा मजबूत करणे हे राष्ट्राचे ध्येय असते. तरच राष्ट्र विकसित बनू शकते. मनमोहन सिंग सरकारने अन्न सुरक्षा कायदा करून शेतकरी, कामगार, मजूर यांचे कल्याणच केले आहे.

Leave a comment