साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
ओडिसिअस इलिटिस
Odysseus Elytis
जन्म : 2 नोव्हेंबर 1911
मृत्यू : 18 मार्च 1996
राष्ट्रीयत्व : ग्रीक
पुरस्काराचे वर्ष: 1979
ओडिसिअस इलिटिस हे ग्रीकचे महान कवी होते. त्यांनी आपल्या काव्यात प्राचीन ग्रीक भाषा न वापरता सामान्य भाषा (बोली भाषा) वापरली. त्यामुळे त्यांच्या कविता लोकांना आपल्या वाटू लागल्या. त्यांनी ग्रीक देशावर झालेल्या आक्रमणाच्या वेळी देशभक्तीपर एक कविता लिहिली होती. तीच कविता ग्रीकची राष्ट्रगीत झाली. ‘द सावरेसन’, ‘द फोर्टिन्थ ब्युटी’, ‘मारिया नेफेल’ हे त्यांचे कवितासंग्रह खूप लोकप्रिय आहेत.