Pranayam: प्राणायाम

प्राणायाम ही श्वासोच्छ्‌वासाची किंवा श्वसन प्रक्रियेशी निगडित अशी प्रक्रिया आहे. श्वसनक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र अवगत करणे म्हणजे प्राणायाम शिकणे होय. प्राणायामला योगिक श्वास म्हणून ओळखले जाते. यात श्वासोच्छ्‌वासाची प्रक्रिया जाणीवपूर्वक हाताळली जाते.

श्वसनसंस्थेच्या क्रियेवर अनेक बाह्य घटकांचा परिणाम होत असला तरी या क्रियेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण प्राणायाम ही योग प्रक्रियेतील महत्त्वाची क्रिया करून प्रयत्न करु शकतो. प्राणायाम ही सर्व वयातील लोकांना शिकण्यासारखी प्रक्रिया आहे. प्राणायामाच्या नियमित सरावाने आसन संस्था, मज्जासंस्था, हृदय, रक्तवाहिन्या इत्यादी घटकांना फायदा होतो. प्राणायामामुळे भावनिक स्थिरता लाभते व मनःशांती लाभते.

प्राणायामचे तीन टप्पे आहेत. पुराक, रेचक आणि कुंभक हे ते तीन टप्पे आहेत. पूराक हे नियंत्रित अंतःश्वसन आहे. म्हणजे नियंत्रित श्वास घेणे. रेचक हे नियंत्रित उच्छ्वास आहे. म्हणजेच नियंत्रित श्वास सोडणे. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. श्वास घेणे यापेक्षा श्वास सोडणे याचा कालावधी जास्त असतो.

प्राणायाम कसा करावा ?Guidelines For the Practice of Pranayama

1.प्राणायम हा शक्यतो आसने करून झाल्यानंतर करावा. प्राणायाम सकाळच्या वेळी करणे फायदेशीर असले तरी दिवसभर कोणत्याही वेळी प्राणायाम करता येतो.

2.प्राणायाममध्ये शक्यतो नाकातून श्वसनक्रिया झाली पाहिजे. याला काही शीतली, शीतकरी सारखे अपवाद आहेत. ओमकार सारख्या अपवादात्मक क्रियेत तोंडातून सोडावा लागतो.

3. प्राणायाम करताना चेहरा नैसर्गिक असावा. चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचा ताण असता कामा नये. चेहऱ्यावरचे स्नायू, डोळे, कान, मान, खांदे किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर ताण असू नये.

4.सुरुवातीला श्वसन प्रक्रिया नैसर्गिक चालली पाहिजे. आपले संपूर्ण लक्ष श्वासोच्छ्‌वासाकडे असले पाहिजे. हळूहळू अंत:श्वसन, श्वास रोखणे, उच्छ्‌वास यांचा कालावधी वाढला पाहिजे.

5.प्राणायाम करताना डोळे बंद असले पाहिजेत.

6.श्वासोच्छ्वासाच्या वेळी आपल्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष दिले पाहिजे. श्वास घेताना पोट थोडेसे फुगते, तर श्वास सोडताना पोट आत जाते. हे लक्षात ठेवावे.

7.श्वास आणि उच्छवास यांचे गुणोत्तर 1: 2 असले पाहिजे. म्हणजे श्वास घेण्याच्या वेळेपेक्षा श्वास सोडण्याची वेळ दुप्पट असली पाहिजे.

Leave a comment