2025 सालात जन्मलेली मुले ही GEN-BETA या पिढीत जन्माला आलेली मुले अशी त्यांना नवीन ओळख मिळणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून ते साधारणपणे 2040 सालापर्यंत जन्माला आलेल्या मुलांवर मोठ्या प्रमाणात AI तंत्रज्ञानाचा आणि प्रचंड वेगाने चालणाऱ्या कम्पूटरचा प्रभाव पडलेला दिसून येईल.
दर 15 वर्षानी नवीन पिढी जन्माला येते असे मानले जाते. दर वेळी ही नवीन पिढी मागील पिढीपेक्षा प्रगत, तंत्रज्ञानात अव्वल, संगणक तज्ज्ञ असणार आहे. AI Generation मधील मुले ही AI तंत्रज्ञानाचा वापर 2 ते 4 वर्षापासूनच करणार आहेत. त्यामुळे ही नवी पिढी मागील पिढीपेक्षा एक पाऊल पुढे असणार आहे. 2040 पर्यंत जगाच्या लोकसंख्येत GEN BETA ची लोकसंख्या साधारणतः 20 ते 25% असेल . म्हणजे येत्या 15 वर्षांत 1/4 लोकसंख्या ही BETA GEN मधील मुलांची असेल आणि काही काळातच ही मुले जगावर आपल्या AI तंत्रज्ञानाच्या जोरावर राज्य करतील. ही नवी पिढी विकसित होत असताना त्या पिढीवर जागतिक घडामोडी, तंत्रज्ञानातील बदल, हवामान, रोगराई यांचा प्रभाव त्यांच्यावर पडत असतो.
History of Generation
(1) The Great Generation- [1901 to 1927) जी.आय. जनरेशन
या पिढीत जन्माला आलेल्या लोकांवर जागतिक युद्ध, महामंदी, या घटनांचा मोठा परिणाम झाला होता . संपूर्ण लोक पहिल्या महायुद्धाच्या घाईत लोटलेले होते. या संकटांवर मात करून पुढे येण्याची क्षमता या पिढीत निर्माण झाली. अर्थात अशी क्षमता निर्माण झालेल्या व्यक्ती खूपच कमी होत्या या पिढीतील अनेक लोकांना उपासमारीला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले.
(2) The Silent Generation-(1928 to 1945)
या काळातील पिढी ही दुसर्या जागतिक महायुद्धातील आणि महामंदीतील पिढी म्हणून ओळखली जाऊ लागली. या काळात अनेक देश रसातळाला गेलेत. जपानसारखा देश उद्ध्वस्त झाला. अनेक देशांत लोकांना जागतिक मंदीला आणि उपासमारीला सामोरे जावे लागले. या पिढीतील लोक सहन कराव्या लागणाऱ्या यातनेतून बरेच काही शिकले होते. जपानसारखा देश नेस्तनाबूत झाला होता. तो बराच काही शिकला आणि पुढे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात याच देशाने क्रांतिकारक पाऊल टाकले.
(3) Baby Boomer: (1946 ते 1964)
1945 साली दुसरे जागतिक महायुद्ध थांबले आणि जग शांत झाले. या काळात जन्माला आलेल्या लोकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागले. हळूहळू जग सावरु लागले. स्थिरस्थावर होऊ लागले. या काळात जागतिक लोकसंख्या प्रचंड वाढली म्हणूनच या पिढीला बेबी बूमर जनरेशन असे म्हटले जाते.
(4) Generation X – 1965 to 1980
या पिढीत जन्माला आलेली मुलं आधीच्या तीन पिढ्यांपेक्षा थोडी अधिक नशिबवान ठरली नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या तंत्रज्ञानाचा आणि सुविधांचा या पिढीवर निश्चितच प्रभाव पडलेला दिसून येतो. अर्थात भारतात तो प्रभाव खूप कमी प्रमाणात राहिला असला तरी पुढील पिढीसाठी ही पिढी मार्गदर्शक ठरली.
(5) Generation-Y-1981 ते 1996
1981 ते 1996 या काकार जगर सर्वाधिक बदल झाला. नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास या काळात झाला. या पिढीतील मुलांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे कौशल्य आत्मसात केले.
(6) Generation Z-1997 ते 2009
या काळात जन्माला आलेली पिढी ही मोठया प्रमाणात इंटरनेटचा वापर करू लागली. त्यामुळे सर्वच क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत गेली. इंटरनेट आणि गॅजेटवर ही पिढी जास्तीत जास्त अवलंबून राहू लागली. याच काळात भारतात Smart Phone चा वापर नुकताच सुरु झाला होता. पण प्रत्यक्षात इंटरनेटचा वापर करणाऱ्या व्यक्ती खूप कमी होत्या.
(7) Generation AIFA: 2010 to 2024
सोशल मिडियाचा प्रचंड वापर आणि Smart phone चा प्रचंड वापर या अल्फा जनरेशनच्या काळात होऊ लागल्याने अगदी सहा महिन्यांच्या बाळालाही Smart Phone चे वेड लागू लागले. भारतासारख्या देशात smart-phone गावोगावी पोहोचला आणि social Media चा वापर उपयुक्ततावादापेक्षा अफवा पसरवणे, दुरुपयोग करणे सोशल मिडियावर जे येते ते बरोबर मानणे, Edited Videos चा सुळसुळाट याच काळात झाला. भारतच काय, संपूर्ण जग Social media ने व्यापली गेले. अनेक आदर्शवत प्रतिमा मलिन करण्यात सोशल मिडिया यशस्वी झाली होती. भारतात नेहरु, गांधी घराण्याला बदनाम करण्यासाठीच जणू काही social media आहे की काय ? असे वाटू लागले. या काळातील पिढीकडून smart phone आणि Social Media चा सदुपयोग करून घेण्यास सरकार सर्व पातळींपर अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
(8) Gen-Beta-AI-2025 ते 2040
या पिढीतील मुले AI तंत्रज्ञानाची शिकार होणार की AI तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन आणि व्यावहारिक जीवनात करण्यात यशस्वी होणार, हे येणारा काळच ठरवेल. AI तंत्रज्ञानामुळे एकाच click वर प्रचंड ज्ञान मिळेल. या काळात कॉम्प्युटर प्रचंड वेग वाढणार आहे.
या काळात Bio Physics चा ही वापर मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या शरीरातील एखादा अवयव निकामी झाला असेल तर 3D प्रिंटींगच्या साहाय्याने अवयव तयार करून नवीन अवयव बसवण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
BETA Generation मध्ये AI तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्याचा योग्य उपयोग झाला नाही तर या Generation ची मुले वाह्यात जाऊ शकतात. AI तंत्रज्ञानाचे खूप उपयोग आहेत हेही लक्षात घ्यावे.