० महाराष्ट्रात 27,993 ग्रामपंचायती आहेत.
* सातारा जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे 1400 हून अधिक ग्रामपंचायती आहेत. 10,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात ‘ग्रामपंचायत’ असते.
* डोंगराळ भाग वगळता किमान 300 ते 500 लोकसंख्या असलेल्या गावात ग्रामपंचायत स्थापन करता येते.
* लहान-लहान दोन-तीन गावांसाठी ‘ग्रुप ग्रामपंचायत’ अस्तित्वात असते.
१) ग्रामपंचायत रचना व सदस्य संख्या :
* ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सदस्य असतात.
* ग्रामपंचायतीत सदस्यांची संख्या लोकसंख्येवर अवलंबून असते.
* ग्रामपंचायतीत 50% जागा महिलांसाठी राखीव असतात.
* ग्रामपंचायतीत एकूण सदस्यांच्या 27% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव असतात.
* ग्रामपंचायत सदस्यांची निवड प्रभाग (वॉर्ड) वार होते.
* प्रत्येक प्रभागात दोन किंवा तीन सदस्य असतात.
* मुदत : ग्रामपंचायतीचा कार्यकाल ५ वर्षांचा असतो.
* ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे सदस्य असतात.
1)सदस्य संख्या
1500 किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या: 7 सदस्य
1501 ते 3000 लोकसंख्या: 9 सदस्य
3001 ते 4500 लोकसंख्या -11 सदस्य
4501 ते 6000 लोकसंख्या:-13 सदस्य
6001 ते 7500 लोकसंख्या:-15 सदस्य
7500 हून अधिक लोकसंख्या:-17 सदस्य
या शिवाय स्वतंत्र सरपंच प्रत्येक ग्रामपंचायतीत निवडून येतो.
2) ग्रामसभा :
* गावातील 18 वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुष मिळून ‘ग्रामसभा’ तयार होते.
* ग्रामसभेपुढे प्रत्येक वर्षाचे अंदाजपत्रक व विकासाच्या योजना मंजुरीसाठी ठेवण्यात येतात.
* ग्रामसभेच्या वर्षातून चार ते सहा बैठका घ्याव्या लागतात.
* ग्रामसभेच्या बैठका न झाल्यास सरपंचाला पदमुक्त व्हावे लागते.
* ग्रामपंचायतीला जादा अधिकार देण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा केली आहे.
3) सरपंच व उपसरपंच :
* ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षणानुसार सरपंच पदाची निवडणूक होते.यासाठी संपूर्ण गाव मतदान करते.यालाच लोकनियुक्त सरपंच म्हणतात.
* ग्रामपंचायतीचे सदस्य आपल्यापैकी एकाची ‘उपसरपंच’ म्हणून निवड करतात.
* सरपंच हा ग्रामपंचायतीच्या सभांचा व ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.
* उपसरपंच सरपंचाला कामकाजात मदत करतो.
4) मासिक बैठक:
* ग्रामपंचायतीला महिन्यातून कमीतकमी एक सभा बोलावणे बंधनकारक आहे.
* सभेला निम्म्यापेक्षा जास्त सदस्य उपस्थित राहणे आवश्यक आहे.
* जिल्हा परिषद स्थायी समिती, तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केल्यास ग्रामपंचायतीची खास सभा बोलवावी लागते.
५) ग्रामसेवक :
* शासकीय प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायतीचे कार्यालयीन कामकाज व दैनंदिन व्यवहार चालवण्यासाठी शासनामार्फत ‘ग्रामसेवका’ची नेमणूक केली जाते.
* ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा ‘सचिव’ असतो.
* ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या सभांचे व ग्रामसभांचे इतिवृत्तान्त लिहितो.
* ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास खात्याचा तृतीय श्रेणीतील सेवक असतो.
* ग्रामसेवकाची बदली, बढती, नेमणूक करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असतो.
6) ग्रामपंचायतीची कामे :
* गावातील रस्ते बांधणे, दुरुस्त करणे, स्वच्छता ठेवणे.
* सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करणे.
* गावात दिवाबत्तीची सोय करणे.
* वैद्यकीय उपचाराची सोय करणे.
* जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे.
* घरफाळा, पाणीपट्टी आकारणे व वसूल करणे.
* गावाला नियमित, सुरळीत व शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे.
* सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
* गावची यात्रा भरवणे, त्यासाठी कर आकारणे.
* शासनाच्या विविध योजना राबवणे. (कृषी विकास, पशुसंवर्धन, दुग्धशाळा, समाजकल्याण, ग्रामीण उद्योग, वने, गायराने, वृक्षारोपण इत्यादी).
7) सरपंचाची कामे :
* मासिक सभा, ग्रामसभा बोलावणे.
* ग्रामपंचायतीच्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
* पुढील वर्षांसाठीचे अंदाजपत्रक बनवणे.
* विकासकामांची कार्यवाही करणे,
* शासनाच्या विविध योजना राबविणे,
८) ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने :
* सरकारी अनुदान: विविध योजनांतर्गत सरकारी अनुदान
* कर : घरफाळा, पाणीपट्टी, आरोग्य कर, दिवाबत्ती कर, करमणूक कर इत्यादी.
* मोकळ्या जागांवरील कर, इमारत भाडे इत्यादी.