AI Partner

AI तंत्रज्ञान म्ह‌णजे Artificial Intelligence चे तंत्रज्ञान होय. AI चा वाढता प्रभाव आणि उपयुक्तता पाहता AI चे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाश्चात्य देशात AI जाळे पसरलेले आहे. भारतात ही विविध वि‌द्यापीठांनी AI तंत्रज्ञानाचे कोर्सेस सुरु केले आहेत.

सध्याचे जग वेगवान झालेले आहे. या वेगवान जगात Natural Partner मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेकजण AI Girlfriend, AI Boyfriend, Virtual Husband, Digital friend group, अशा अनेक साथीदारांशी मैत्री करतात आणि त्यांना आपल्या आयुष्यातील एक भाग बनवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या 99 डॉलरमध्ये आपल्याला हवा तसा Virtual Partner मिळू शकतो. त्याच बरोबर कोट्यवधी रुपये खर्च करून AI ने Aria (आरिया) ही Robot Girlfriend बनवली आहे.

AI तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांनी Character Dot AI, Replica, Candy Dot AI, Qupit Dot AI, Wife Dot app यांसारखी अनेक Apps ची निर्मिती झालेली आहे ही apps आपल्याला इंटरनेटवर मिळतात. Artificial Partner मुळे नातेसंबंधाच्या संकल्पना बदलत आहेत. अर्थ बदलत आहे.

What is meaning of AI Partner?

AI Partner म्हणजे अशी एक Artificial आभासी प्रणाली आहे, की जी वापरकर्त्याशी योग्य, गरजेनुसार संभाषण करु शकते, ही प्रणाली भावनिक प्रतिसाद देते. कधी कधी मानवी सह‌वासात अपेक्षित असलेले वर्तनही करते. Text depend Partner, Voice defect partner Robotic Partner असे AI Partner चे अनेक प्रकार आहेत.

सध्या रिअलबोटिक्स या अमेरिकन कंपनीने ‘आरिया'(aria) हा रोबोट लाँच केला आहे. हा रोबोट खूप गाजत आहे. या रोबोटची खरेदीही वाढत आहे. वापरकर्त्यांमध्ये आरिया Girlfriend प्रचंड लोकप्रिय होत आहे.

AI Partner वापराचे परिणाम: Implications of AI Partner use

(A) AI भागीदारावर अवलंबून राहणे

AI Partner वापरकर्ते जास्तीत जास्त आपल्या AI Partner वर अवलंबून राहतात. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या सर्व समस्या ते आपल्या पार्टनरशी शेअर करतात आणि पार्टनरने दिलेल्या suggestion चा अंमल करतात. प्रत्येक समस्येवर आपला AI पार्टनर योग्य सल्ला देईलच याची कोणतीही खात्री नसते.

(B) Live Partner is the best way

आपल्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी AI पार्टनरवर प्रत्येक वेळी अवलंबून राह‌ण्यासाठी आपल्या नात्यागोत्यातील, इष्टमित्रातील एखादी भावनिक आणि मानसिक दृष्ट्या समंजस असेल, तर अशा व्यक्तीशी आपली friendship जुळवणे हे आपल्यासाठी उपयुक्त ठरते. भावनिक समंजसपणा AI Partner देऊ शकत नाही

(C) मानसिक आरोग्य: Mental Health

आपण AI Partner वर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागलो तर आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते. काही प्रसंगी नैराश्य येऊ शकते. आपला पार्टनर वास्तव जीवनातील असेल तर आपले नातेसंबंध अधिक विकसित होते . ते टिकवण्यासाठी मदत होते. भावनाशून्य AI पार्टनरशी असे नातेसंबंध प्रस्थापित करता येत नाही.

(D) Why do you need AI Partner?

आपल्याला मिळणारा एकाकीपणा, आपल्या चिंता दूर करण्यासाठी AI Partner चा चांगलाच उपयोग होतो. अनेक वेळा भावनिक आधार मिळतो. आपल्या व्यावसायिक समस्या, शिक्षण विषयक समस्या share करण्यासाठी AI Partner उपयुक्त ठरतो.

Leave a comment