AI technology : AI आणि माणूस

मानवी जीवनात दिवसेंदिवस AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. तंत्रज्ञानाच्या जगात अनेक गोष्टी वेगाने वाढत आहेत. AI चा म्हणजेच Artificial Intelligence वापर प्रचंड वाढत आहे. या AI च्या विकसित तंत्रज्ञानामुळे माणसाच्या परावलंबित्वाचीही वाढ होत चालली आहे. अनेक गुंतागुंतीचे जटिल प्रश्न सोडवण्यासाठी माणूस AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळे माणूस आळशी बनत चालला आहे की काय ? माणसाने खूप विचार करणे सोडून दिले की काय ? असे आता वाटू लागले आहे. आणि खरोबर जर भविष्यात तसेच घडत गेले तर निश्चितच माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते.

माणूस हा मुळातच आळशी प्राणी आहे. आपल्याला बर्‍याच गोष्टी सहज मिळाव्यात, अधिक कष्ट करायला लागू नयेत. याच विचाराने माणसाने अनेक शोध लावले असले तरी AI च्या वाढत्या वापरामुळे माणूस भविष्यात नक्कीच आणखी आळशी बनेल. सध्याच्या जगातील तरुण AI तंत्रज्ञाचाचा खूप वापर करत आहेत. तरुणांचे संज्ञात्मक अपलोडिंग वाढत आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आजचा तरुण विवार न करता AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीची विचार करण्याची क्षमता कमी होते की काय अशी भीती वाटू लागली आहे.

Leave a comment