Jaundice हा वरवर पाहता सर्वसाधारण आजार वाटतो;पण या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर मग आजार हाताबाहेर जातो.म्हणून या रोगाबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
पावसाळ्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे रूग्ण हे कावीळीचे असतात.याशिवाय पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ ,रक्तातील कावीळ इत्यादी कावीळचे प्रकार लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे.प्रथम आपण कावीळ होण्याची कारणे जाणून घेऊया.
Causes of Jaundice :कावीळ होण्याची विविध कारणे :
Infection जंतुसंसर्ग:
जंतूसंसर्गालाच इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्गामुळे अति सूक्ष्मजीवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते.
hepatitis A and B हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई
यासारखे विषाणू दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात.तेथे यकृतावर हल्ला करतात . आपण जी कावीळ म्हणतो ती याच मुळे होते. तिची लक्षणे पाहून व रक्त तपासणी करून निदान निश्चित करता येते. यामध्ये..
रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात .
लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते.
रक्त तपासणीमध्ये बिलीरुबीन, एसजीओटी, एसजीपीटी, जीजीटी हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते.
हेपाटायटीस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटीस ई होतो.
hepatitis B and C हेपेटायटिस बी आणि सी
हे विषाणू रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरॉयसिस होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच कावीळचे योग्य निदान करणे आवश्यक असते.
hepatitis B and C हेपेटायटिस बी आणि सी
याप्रकारची कावीळ होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
1.दूषित रक्त चढवल्याने बी आणि सी विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात.
2 इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे. शिवाय ऑपरेशनची इन्स्ट्रुमेंट्स जर हेपेटायटिस बी आणि सीच्या रुग्णांमुळे इन्फेक्टेड असतील व नीट निर्जंतूक नसतील, तर रुग्णाला हेपेटायटिस बी आणि सी होऊ शकतो.
3 ड्रग ॲडिक्ट : स्वतःला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा विषाणू शरीरात शिरू शकतो. टॅटू काढून घेतल्याने हा विषाणू शरीरात शिरू
शकतो.
4 असुरक्षित लैंगिक संबंध: हिपॅटायटीस बी किंवा सी झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपाटायटीस होतो.
5 आई हेपेटायटिस बी किंवा सी मुळे इन्फेक्टेड असेल, तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हा आजार होऊ शकतो.
How to diagnose Jaundice? कावीळचे निदान कसे करायचे?
1 रुग्णाची नीट तपासणी केली जाते. यकृताला किती सूज आहे? हेही पाहिले जाते.
2 विविध प्रकारची रक्ततपासणी करून कोणत्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते .त्यामुळे काविळीची तीव्रता कळते.
3 अल्ट्रासोनोग्राफी करून लिव्हरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तनलिका इत्यादी पाहिले जाते. या पलीकडे सिटी स्कॅन, एमआरआय, एंडोस्कोपी करून पुढचे तपास केले जातात. यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे, हे वरील तपासणीतून कळते. कावीळचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार केल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे महत्त्वाचे आहे.
more Causes of Jaundice काविळीची आणखी काही कारणे
1 दारू पिण्यमुळे होणारी कावीळ
जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते. यकृताला सूज येते .त्यामुळे कावीळ होते. या कावीळमध्ये यकृताला सूज येणे,पोटात पाणी होणे, सतत आजारी वाटणे अर्थात डोळे पिवळे होणे ही लक्षण दिसतात.
2 औषधाचे यकृतावरील दुष्परिणाम व त्यामुळे होणारी कावीळ
अनेक प्रकारची औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते.
उदाहरणार्थ..
टीबीवरील काही औषधे – (रिफाम्पिसिन, आयसोनियाझाइड), कर्करोग, मधुमेहवरील काही औषधे, एड्सवरील काही औषधे, काही वेदना शामक, काही
कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे.
3 अवरोधक कावीळ :
पित्ताशयाच्या नळीला पित्ताच्या खड्याने वा स्वादुपिंड कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये कावीळबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते. अवरोधक कावीळचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. यावर उपाय हा दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे करावा लागतो.
4 काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात .त्यामुळे कावीळ होते. उदा. हेमोलायटिक जाँडिस आजारात रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते.
5 ऑटोइम्युन डिसऑर्डर : स्वतःच्या प्रतिकार शक्तीने झालेली कावीळ -.
6 काँजेनिटल – जन्मजात यकृतातील दोषामुळे झालेली कावीळ.
7 यकृतातील चरबी खूप जास्त झाल्यास सिरॉयसिस होऊ शकतो. त्यामुळेही कावीळ होऊ शकते.
Remedies उपाय
1 कावीळ झाल्यावर उपाय करण्यापेक्षा कावीळ होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे.
2 पावसाळ्यात आणि नेहमीच पाणी उकळून गार करून प्यावे.
3 नेहमी स्वच्छ आणि शुद्ध पाणी प्यावे.
4 कावीळ झाल्यावर वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत.