2025/26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने नवीन करप्रणाली अंमलात आणली आहे. ही करप्रणाली खरंच मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर आहे का? या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
1 फेब्रुवारी 2025 रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी 2025/26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. भाजपा सरकारच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प असा आहे की मध्यम वर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक ठरला आहे. सरकारच्या धोरणामुळे गेल्या दहा वर्षात मध्यम वर्गीयांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे गोळीबार झालेल्या मध्यम वर्गीयांवर तात्पुरती मलमपट्टी केली असल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी म्हटले आहे.
Income tax free up to 12 lakhs; then how about tax on 4 lakhs? 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त; मग 4 लाखावर टॅक्स का ?
12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न केंद्र सरकारने करमुक्त केले आहे.मग 4 लाखांवर टॅक्स कसा? तेच आपण समजून घेऊया.
(A) एखाद्या करदात्याचे उत्पन्न बरोबर 12 लाख रुपये आहे. तर ते सर्व उत्पन्न करमुक्त असेल, म्हणजे त्या व्यक्तीला 1 रुपया सुद्धा कर भरावा लागणार नाही.
(B) ज्या व्यक्तीचे उत्पन्न 12,00,001 रुपये आहे, तर त्या व्यक्तील 60000 रू. कर भरावा लागेल. अशा वेळी 0 ते 4 लाख रुपये पर्यंतचे उत्पन करमुक्त असेल. 4,00,001 ते 8,00,000 रू. पर्यंतचा उत्पन्नावर 5% कर म्हणजे 20,000 रु .कर आणि 8,00,001 रू. ते 12,00,000 रु. पर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर म्हणजे 40,000 रू. कर असा एकूण 60,000 रू, कर भरावा लागेल.
(C) करदात्या व्यक्ती या पगारदार असतील तर त्यांना 75,000 रुपयांचे स्टॅण्डर्ड डिडक्शन मिळणार आहे .म्हणजे पगारदार व्यक्तींना 12,75,000 रुपयांचे उत्पन्न करमुक्त असेल.
(D) दरमहा किमान 1,05,000रु उत्पन्न (पगार) असेल तर अशा पगारदार व्यक्तीचे उत्पन्न करमुक्त असेल.
How much will anyone benefit? कुणाला किती फायदा होईल?
(A) ज्यांचे उत्पन्न 8,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 30,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 30,000 रू.ची बचत होईल.
(B) ज्यांचे उत्पन्न 9,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 40,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 40,000 रू.ची बचत होईल.
(C) ज्यांचे उत्पन्न 10,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 50,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 50,000 रू.ची बचत होईल.
(D) ज्यांचे उत्पन्न 11,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 65,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 65,000 रू.ची बचत होईल.
(E) ज्यांचे उत्पन्न 12,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 80,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 80,000 रू.ची बचत होईल.
(F) ज्यांचे उत्पन्न 16,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 1,70,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 50,000 रू.ची बचत होईल.
(G) ज्यांचे उत्पन्न 20,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 2,90,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 90,000 रू.ची बचत होईल.
(H) ज्यांचे उत्पन्न 24,00,000 रू. पर्यंत आहे, त्यांना सध्याच्या करप्रणाली नुसार 4,10,000 रू. टॅक्स बसतो.नव्या करप्रणालीनुसार त्यांची 1,10,000 रू.ची बचत होईल.