साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
केंजाब्युरो ओए
Kenzaburo Oe
जन्म : 31 जानेवारी 1935
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : जपानी
पुरस्कार वर्ष: 1994
केंजाब्युरो ओए हे जपानचे श्रेष्ठ कादंबरीकार. त्यांना 1994 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे दुसऱ्या जपानी साहित्यिक व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. दुसऱ्या महायुद्धात जपानचे खूप नुकसान झाले. जपानला खूप दुःख भोगावे लागले. ओए यांच्या लेखनात ह्या यातना पाहायला मिळतात. ‘द सायलेंट क्राय’ ही त्यांची कादंबरी खूपच गाजली. ‘पर्सनल मॅटर’ ही कादंबरी व्यक्तिगत जीवनावर आधारित आहे.