साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
गाओ झिन्जिआन
Gao Xingjian
जन्म : 4 जानेवारी 1940
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : चिनी
पुरस्कार वर्ष: 2000
गाओ झिन्जिआन हे चीनचे प्रसिद्ध साहित्यकार आहेत. त्यांनी स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा पुरस्कार केला. त्यामुळे त्यांना चिनी सरकारचा त्रास होऊ लागला. नाइलाजाने आपला देश सोडून त्यांना पॅरिसला जाऊन राहावे लागले. त्यांच्या साहित्याचे पाश्चिमात्य देशातील लोकांनी चांगलेच स्वागत केले. त्यांना २००० सालचा नोबेल पुरस्कार मिळाला.