Climate of india-भारत : वारे, तापमान, पर्जन्य जाणून घ्या एका क्लिक वर

वारे :

१) नैऋत्य मोसमी वारे:

जून ते सप्टेंबर या कालावधीत हे वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे भारतात पाऊस पडतो.

२) ईशान्य मोसमी वारे:

सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत हे वारे वाहतात. या वाऱ्यांमुळे तमिळनाडूत हिवाळ्यात पाऊस पडतो.

३) जेट स्ट्रीम :

अक्षवृत्तीय प्रदेशात जास्त उंचीवर पश्चिमेकडून पूर्वेकडे व पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वारे वाहतात. हे वारे अतिवेगवान असतात.

४) नॉर्वेस्टर :

उन्हाळ्यात पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये बंगालच्या उपसागरातून हे बाष्पयुक्त वारे वाहतात. या वाऱ्यांचा वायव्येकडून आलेल्या वाऱ्याशी संगम होतो व वादळाची निर्मिती होते. त्यालाच ‘नॉर्वेस्टर’ म्हणतात. नॉर्वेस्टर वाऱ्यांना ‘कालबैसाखी’ म्हणतात.

५) आँधी :

उन्हाळ्यात उत्तर भारतात पश्चिमेकडून धुळीच्या वावटळो येतात. यालाच पंजाबमध्ये ‘आँधी’ म्हणतात.

तापमान :

भारतात सरासरी तापमान २०० सेल्सिअस ते २७० सेल्सिअसच्या दरम्यान असते. आंध्र व तमिळनाडूमध्ये सरासरी तापमान सर्वाधिक असते.

पर्जन्य व ठिकाण :

१) अतिपर्जन्य (२५० सेंमीपेक्षा जास्त) : भारताचा पश्चिम किनारा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम.

२) जास्त पर्जन्य (१५० सेंमी ते २५० सेंमी): हिमालयाचा पायथा, पश्चिम घाट (सह्याद्री), मध्य प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल, आसाम.

३) मध्यम पर्जन्य (६० सेंमी ते १०० सेंमी) : जम्मू-काश्मीरचा नैर्ऋत्य भाग, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, गुजरात इत्यादी.

४) मध्यम पर्जन्य (१०० सेंमी ते १५० सेंमी): उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड.

५) कमी पर्जन्य (४० ते ६० सेंमी) : पूर्व राजस्थान, पश्चिम गुजरात, पश्चिम पंजाब, पूर्व हरियाणा.

६) अति कमी पर्जन्य (४० सेंमीपेक्षा कमी) कच्छचे रण, पश्चिम राजस्थान, नैऋत्य पंजाब, जम्मू-काश्मीरचा उत्तरेकडील भाग.

Leave a comment