Famous Falls in India -भारतातील प्रसिद्ध धबधबे
पावसाळ्यात सर्वांत जास्त आकर्षणाचा विषय म्हणजे धबधबा होय. भारतात अनेक रोमहर्षक धबधबे आहेत. त्यांचीच माहिती जाणून घेऊया.
गिरसप्पा धबधबा:
कर्नाटक राज्यात शरावती नदीवर २५३ मीटर उंचीचा हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे राजा, राणी, रॉकेट, रोअरर हे चार धबधबे प्रसिद्ध आहेत.
शिवमुद्रम धबधबा :
कर्नाटक राज्यात कावेरी नदीवर ९८ मीटर उंचीचा हा धबधबा प्रसिद्ध आहे.
हुंड्र धबधबा :
झारखंड राज्यात सुवर्णरेखा नदीवर ७४ मीटर उंचीचा ‘हुंड्र धबधबा’ आहे.
गोकाक धबधबा :
कर्नाटक राज्यात घटप्रभा नदीवर ‘गोकाक धबधबा’ आहे. या धबधब्याची उंची ५५ मीटर आहे.
चित्रकोट धबधबा:
छत्तीसगड राज्यात इंद्रावती नदीवर ३० मीटर उंचीचा चित्रकोट धबधबा आहे. हा धबधबा भारतातील सर्वांत जास्त रुंदीचा (६५० फूट) धबधबा म्हणून ओळखला जातो. या धबधब्यास ‘भारताचा नायगारा’ असे म्हणतात.
अथिरापल्ली धबधबा :
केरळ राज्यातील चालुकुडी नदीवर २४ मीटर उंचीचा ‘अथिरापल्ली’ धबधबा आहे.
चुलियाँ धबधबा :
मध्य प्रदेशातील चंबळ नदीवर १५ मीटर उंचीचा ‘चुलियाँ धबधबा’ आहे.
पुनासा धबधबा :
मध्य प्रदेशातील चंबळ नदीवर १२ मीटर उंचीचा ‘पुनासा धबधबा’ आहे.
धुवाधार धबधबा :
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवर १० मीटर उंचीचा ‘धुवाधार धबधबा’ आहे.