तुम्ही सकाळी जोड नाश्ता करता तो आरोग्य संपन्न असतो का? आपला नाश्ता आरोग्यदायी आणि आयुष्यमान वाढवणारा असावा असे तुम्हाला वाटत नाही का? तर जाणून घ्या अधिक माहिती.
सकाळचा आरोग्यदायी नाष्टा
सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी एक ते दोन ग्लास कोमट पाणी किंवा नारळ पाणी प्यावे. असे पाणी पिल्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
नाष्टा
सकाळचा नाश्ता हा सॅलड स्वरूपात असावा. म्हणजे फळे, गाजर, मुळा , बीट , नवलकोल मोड आलेले धान्य यांचे एकत्रित मिश्रण करून असा नाष्टा आपण घ्यावा. वाटल्यास त्यात थोडा सेंद्रिय गुळाचा चूर्ण टाकावा. हा नाश्ता खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी असतो. दररोज सकाळी आपले पोट साफ होण्यास हा नाश्ता मदत करतो. म्हणून सर्वांनी आपल्या आहाराची सवय बदलून सॅलड स्वरूपात नाश्ता घ्या आणि आयुष्यमान व्हा.
शिरा, उपीट, कांदेपोहे टाळावे
अनेकांना सकाळी नाष्ट्यामध्ये शिरा, उपीट , कांदेपोहे असलेला नाश्ता खूप आवडतो. असा तेलात परतून किंवा तूप घालून केलेला नाष्टा हा आपल्याला त्रासदायक असू शकतो. अशा स्वरूपाचा नाश्ता पचनास जड असतो. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढू शकते. सकाळच्या वेळी हलका फुलका नाष्टा घ्या आणि निरोगी रहा.