नोबेल शांतता पुरस्कार विजेते
लिऑन व्हिक्टर-ऑगस्ट बोर्जिओ
Leon victor-Auguste Bourgeois
जन्म: 21 मे 1851
मृत्यू: 29 सप्टेंबर 1925
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1920
1899 साली ‘हेग’ या ठिकाणी ‘शांतता संमेलन’ आयोजित केले होते. या संमेलनात लिऑन व्हिक्टर-ऑगस्ट बोर्जिओ यांनी फ्रान्सचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला होता. त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे अशी मांडली की, ‘राष्ट्राराष्ट्रांमधील तंटे एकमेकांच्या सहकार्याने, चर्चेने सोडवायला हवेत.’ ते ‘लीग ऑफ नेशन्स’चे सुद्धा कट्टर समर्थक होते. सामाजिक समानतेचे ते पुरस्कर्ते होते. या सर्व कार्यासाठी त्यांना 1920 साली शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.