Ancient India: Prehistoric Period- प्रागैतिहासिक काळ (पाषाणयुग) चा इतिहास जाणून घ्या एका क्लिक वर

* प्राचीन भारत:

अश्मयुगात मानवाने दगड, लाकूड, हाडे यांचा उपयोग हत्यारे व अवा बनवण्यासाठी केला.

*Kinds of stone age अश्मयुगाचे प्रकार –

(१) पुराणाश्मयुग, (२) नवाश्मयुग.

*Paleolithic period पुराणाश्मयुगाचा कालखंड :

2 दशलक्ष ईसापूर्व ते इ.स. 30000 वर्षे

*Period of the Inter-Stone Age कालखंड:

इ.स पूर्व 30000 वर्षे ते इ.स. पूर्व 10000 वर्षे.

*Neolithic period नवाश्मयुगाचा कालखंड :

इ.स पूर्व 10000 ते इ.स. पूर्व 500 वर्षे

*Locations where Stone Age weapons have been found अश्म युगातील हत्यारे सापडलेली ठिकाणे :

कांग्रा आणि बेलन बोरे (उत्तर प्रदेश)

महेश्वर, राजपिपला (मध्य प्रदेश)

• गुलेर (पंजाब)

• नेवासे, इनामगाव (महाराष्ट्र)

• लंघनाज (गुजरात)

• ब्रह्मगिरी (कर्नाटक).

*Characteristics of Navashma Yuga नवाश्मयुगाची वैशिष्ट्ये :

शिकार करणे. शेतीचा प्रारंभ. भटक्या जीवनाची अखेर स्थिर जीवनाची सुरुवात. कातडे सोलणे. मांसाचे तुकडे करणे. झाडांची साल काढणे. पशुपालनास सुरुवात. मातीची भांडी बनवणे. धातूचा वापर. धर्मकल्पनांचा उदय.

*Cultural Life of Stone Age Man अश्मयुगातील मानवाचे सांस्कृतिक जीवन :

*Residences of stone age man निवासस्थाने :

सुरुवातीला मानवाने गुहा व खडकातील कपारींचा उपयोग केला. या गुहांची व कपारींची तोंडे वाऱ्याच्या दिशेला असणार नाहीत याची दक्षता घेतली जात होती. त्यानंतरच्या काळात वासुदेवाच्या टोपीच्या आकाराच्या झोपड्या बांधण्याचे तंत्र विकसित झाले. झोपड्यांसाठी झाडांचा पाला, बांबू, लाकडे, गवत, कातडे यांचा वापर होऊ लागला. नवाश्मयुगाच्या शेवटी दगड, माती, लाकूड, बांबू यांचा वापर होऊ लागला.

*हत्यारे व अवजारे :Weapons and tools of stone age man

मानवाचे भटके जीवन नष्ट झाल्यावर गारगोटीपासून धारदार पाती, छोट्या छिन्न्या, टोकदार बाण इत्यादी हत्यारांची निर्मिती झाली. सांबरांची शिंगे व हाडे यांचाही हत्यारासाठी उपयोग होऊ लागला. कठीण कुऱ्हाडीचा वापर होऊ लागला. भांडी बनवण्यासाठी कुंभाराच्या चाकाचा वापर होऊ लागला. शेतीचा शोध लागला.

*Agriculture and animal husbandry of stone age man शेती व पशुपालन :

अश्मयुगातील मानवाच्या प्रगतीचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दीर्घकालीन निरीक्षण आणि अनुकरणातून शेतीचा व पशुपालनाचा जन्म झाला.

*वेशभूषा :Costumes of stone age man

सुरुवातीच्या काळात मानव नग्न अवस्थेत फिरत होता. ताग, जवस, वाख इत्यादीच्या धाग्यांना पीळ देऊन माणूस जाडीभरडी वस्त्रे बनवू लागला.

Leave a comment