नोबेल शांतता पुरस्कार विजेते
बर्था बॉन सटनर
Bertha Von Suttner
जन्म: 9 जून 1843
मृत्यू: 21 जून 1914
राष्ट्रीयत्व: ऑस्ट्रियन
पुरस्कार वर्ष: 1905
बर्था बॉन सटनर या नोबेल पारितोषिक मिळालेल्या पहिल्या महिला आहेत. त्यानंतर अनेक महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. बर्था वॉन या एक उत्कृष्ट कादंबरी लेखिका होत्या. त्यांची एक कादंबरी ‘ले डाऊन यॉर आर्म्स’ ही जगप्रसिद्ध कादंबरी आहे. याच महिलेने अल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांना शांतता पुरस्काराची स्थापना करण्यासाठी प्रेरित केले होते. त्यांच्या कादंबरीची तुलना ‘अंकल टॉम्स केबिन’ (टॉम काकाची झोपडी) या जगप्रसिद्ध कादंबरीशी केली जाते. त्या आंतरराष्ट्रीय शांततावादी पत्रकाच्या संपादिका सुद्धा होत्या.