नोबेल शांतता पुरस्कार विजेते
अल्फ्रेड हरमान फ्राईड
Alfred Hermann Fried
जन्म : 11 नोव्हेंबर 1864
मृत्यू : 5 मे 1921
राष्ट्रीयत्व : ऑस्ट्रियन
पुरस्कार वर्ष: 1911
अल्फ्रेड हरमान फ्राईड यांनी जर्मनीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ते एक उत्तम पत्रकार आणि कायदेतज्ज्ञ होते. त्यांचा असा विचार होता की, आंतरराष्ट्रीय असंतोष, अशांतता समाप्त करण्यासाठी कायद्यामध्ये आणि व्यक्तींच्या चारित्र्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यांना 1911 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार टोबिआज माईकेल कारेल असर यांच्यासह विभागून देण्यात आला.